Sakharkherda result : येथील एस.ई.एस. ज्युनियर कॉलेजने आपल्या यशाची परंपरा कायम राखत यावर्षीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विज्ञान, कला, वाणिज्य व एमसीव्हीसी या चारही शाखांचा इयत्ता 12 वीचा निकाल 100 टक्के लागला आहे.

रेश्मा सुजीत महाजन प्रथम, अक्सा अकबर शेख दुसरी
साखरखेर्डा : येथील एस.ई.एस. ज्युनियर कॉलेजने आपल्या यशाची परंपरा कायम राखत यावर्षीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विज्ञान, कला, वाणिज्य व एमसीव्हीसी या चारही शाखांचा इयत्ता 12 वीचा निकाल 100 टक्के लागला आहे.
तर स्व. भास्करराव शिंगणे कला, नारायणराव गावंडे विज्ञान आणि आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयाचा निकाल 98.50 टक्के लागला आहे. दोन्ही महाविद्यालयांतून रेश्मा सुजीत महाजन हिने 94.83 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. अक्सा अकबर शेख हिने 91.67 टक्के गुणांसह द्वितीय, तर गौरी शशिकांत काटे आणि दिशा साहेबराव सवडदकर यांनी प्रत्येकी 90.67 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे.
एस.ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातून एकूण 309 विद्यार्थी परीक्षेस बसले होते आणि सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100 टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेत अक्सा अकबर शेख (91.67), गौरी शशिकांत काटे (90.67) आणि राजू रामसिंग राजपूत (89.83) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवले.कला शाखेत समिक्षा राजेंद्र खिल्लारे (79.67), रोहन परमेश्वर खिल्लारे (78.50) आणि कोमल शत्रुघ्न खिल्लारे (77.84) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवले. वाणिज्य शाखेत प्रेम विलास अंभोरे (85.50), अथर्व योगेश कुळसुंदर (82.00) आणि मोहिनी मुकुंदा गुरव (81.50) यांनी उल्लेखनीय यश मिळवले.एमसीव्हीसी शाखेत ज्ञानेश्वर आनंदा जाधव (71.67), पल्लवी संतोष लहाने (72.17) आणि सागर सिताराम कव्हळे (69.67) यांनी यश संपादन केले.
दरम्यान, स्व. भास्करराव शिंगणे कला, नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयातून 175 पैकी 173 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेत रेश्मा सुजीत महाजन (94.83), दिशा साहेबराव सवडदकर (90.67) आणि प्रतीक मदन पाझडे (88.83) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.कला शाखेत प्राची रामेश्वर गिऱ्हे (76.83) आणि किर्ती खंडू अवचार (76) यांनी चांगली कामगिरी नोंदवली आहे.

