Ganpati bappa: यावर्षी हिंगणा येथील गावकर्यांनी श्री गणेश मूर्तीचे विसर्जन पर्यावरण पूरक पद्धतीने करून सर्व मातीच्या श्री गणेश मूर्ती चे मातीच्या कुंडी मध्ये विसर्जन केले.त्यानंतर प्रत्येक कुंडीमध्ये एक झाडाचे रोपटे लावण्यात आले.
राहुल सोनोने
वाडेगाव:पातुर तालुक्यातील हिंगणा वाडेगाव येथे वाढदिवस वृक्ष संकल्पनेचे जनक शेषनाग आनंदराव उजाडे हे मागील तीन वर्षांपासून आपल्या मित्रांच्या सहकार्याने “ना नफा ना तोटा” तत्वावर गावात मातीच्या श्री गणेश मूर्ती चे वाटप करतात.
यावर्षी हिंगणा येथील गावकर्यांनी श्री गणेश मूर्तीचे विसर्जन पर्यावरण पूरक पद्धतीने करून सर्व मातीच्या श्री गणेश मूर्ती चे मातीच्या कुंडी मध्ये विसर्जन केले.त्यानंतर प्रत्येक कुंडीमध्ये एक झाडाचे रोपटे लावण्यात आले.
पीओपी च्या श्री गणेश मूर्ती ह्या पर्यावरणाला हानिकारक आहेत तसेच त्यामुळे श्री गणेश मूर्तीची विटंबना सुद्धा होते.
याच कारणांमुळे हिंगणा येथील शेषनाग उजाडे यांनी आपल्या मित्रांच्या सहकार्याने या वर्षी पासून पर्यावरण पूरक पद्धतीने गणपती विसर्जनाची संकपल्पना आपल्या गावात सुरु केली. या कार्यक्रमच्या आयोजनासाठी सोपान उजाडे, गणेश इंगळे, अंकित उजाडे, विश्वास उजाडे, प्रमोद उजाडे, गणेश उजाडे व सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केले.