Five Robbers : चिखली शहरातील राजवाडा परिसरात लुटमार करणारे पाच दरोडेखोरे स्थानिक गुन्हे शाखा आणि अंढेरा पोलिसांच्या पथकाने अवघ्या २४ तासांत सिनेस्टाईल पाठलाग करीत जेरबंद केले. या दरोडेखोरांच्या ताब्यातून पोलिसांनी सुमारे 4 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जालना हद्दीत थरार; शेतातून ३ किमी पाठलाग करत आरोपींना पकडले,4.80 लाख रुपयांचा एवज जप्त
बुलढाणा : चिखली शहरातील राजवाडा परिसरात लुटमार करणारे पाच दरोडेखोरे स्थानिक गुन्हे शाखा आणि अंढेरा पोलिसांच्या पथकाने अवघ्या २४ तासांत सिनेस्टाईल पाठलाग करीत जेरबंद केले. या दरोडेखोरांच्या ताब्यातून पोलिसांनी सुमारे 4 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणी फिर्यादी चंद्रशेखर गुंडय्या स्वामी (रा. शंकरनगर, वसरणी, नांदेड) यांनी 1 मे रोजी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपींनी रत्न व सुलेमानी हकीक खड्याची विक्री करण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांना चिखली येथील राजवाडा परिसरात बोलावले. खडा खरेदीसाठी ते तेथे पोहोचताच आरोपींनी संगनमताने त्यांच्यावर चापटा-बुक्क्यांनी व काठ्यांनी हल्ला केला. त्यानंतर सोने-चांदीचे दागिने व 20 हजार रुपये रोख असा एकूण 4.89 लाखांचा ऐवज जबरीने लुटून आरोपी पसार झाले. घटनेनंतर अंढेरा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान मुख्य आरोपी निलेश भोसले याला साकेगाव येथून अटक करण्यात आली. दरम्यान, उर्वरित आरोपी जालना जिल्ह्याकडे पळून जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी करून त्यांचा पाठलाग सुरू केला. तब्बल ३ किलोमीटर शेतातून धावत पाठलाग करत पोलिसांनी जॅकीचंद पवार, आदित्य भोसले, राज पवार आणि भाऊराजा पवार यांना पकडले. आरोपींकडून सोन्याच्या अंगठ्या, कानातील दागिने, चांदीचे कडे, ब्रासलेट, अष्टधातू गदा, तसेच रोख रक्कम असा एकूण 4.80 लाखांचा मुद्देमाल 100 टक्के जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे आदेशान्वये तर श्रेणिक लोढा अपर पोलीस अधीक्षक खामगांव, अमोल गायकवाड-अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा, संतोष खाडे उपविपोअ. मेहकर प्रभार देऊळगांव राजा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. सुनिल अंबुलकर स्था.गु.शा. बुलढाणा यांचे नेतृत्वात सपोनि. रुपेश शक्करगे पो.स्टे. अंढेरा, PSI प्रताप बाजड, पोहेकॉ. दिगंबर कपाटे, शरद गिरी, पुरुषोत्तम आघाव, मपोहेकॉ. वनिता शिंगणे, पोकॉ. मनोज खरडे, अमोल अंभोरे, मपोकॉ. पूजा जाधव, चासफौ. विकास देशमुख नेमणूक स्था.गु.शा. बुलढाणा., PSI दिनेश घुगे, पोहेकॉ, सिध्दार्थ सोनकांबळे, भरत पोफळे, पोकॉ. किशोर जाधव, श्रीकांत पव्हरे नेमणूक पो.स्टे. अंढेरा., पोहेकॉ. राजू आडवे तांत्रीक विष्लेषण विभाग, बुलढाणा यांचे पथकाने केली.

