two killed on the spot: दाेन दुचाकींची समाेरासमाेर धडक, दाेन जण जागीच ठार

लाखनवाडा ते आंबेटाकळी रस्त्यावरील घटना
खामगाव : भरधाव दाेन दुचाकींची समाेरासमाेर धडक झाल्याने दाेन जण जागीच ठार झाले. ही घटना १२ ऑक्टाेबर राेजी रात्री खामगाव तालुक्यातील लाखनवाडा – आंबेटाकळी रोडवर घडली आहे.योगेश ज्ञानेश्वर जावळे (३०) , गणेश श्रीराम पांढरे (३९) दोघेही रा.लाखनवाडा असे ठार झालेल्या दोघांची नावे आहेत.
योगेश जावळे हे त्यांच्या सासारवाडी महान पिंजर येथून रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान लाखनवाडा येथे आपल्या दुचाकी ने येत होते. गणेश पांढरे हे कामानिमित्ताने लाखनवाडा येथून आंबेटाकळी येथे दुचाकीने जात होता.यावेळी दोघांच्या दुचाकीने नियंत्रण सुटल्याने दोन्ही दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली यातील दोघेही जागीच ठार झाले आहेत.यातील दोघेही विवाहित असून योगेश जावळे याला एक वर्षाची लहान मुलगी आहे.गणेश पांढरे याला सुद्धा एक मुलगा एक मुलगी आहे.या दोघांच्या निधनामुळे लाखनवाडा गावावर शाेककळा पसरली आहे.

