Mahabreaking

[breaking_news]

Zilla Parishad CEO :जि.प.सीईओंची ग्रामपंचायत कोळंबीला भेट; सेवाकार्यातील कार्यक्षमतेचे कौतुक

Zilla Parishad CEO :महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत  २८ एप्रिल हा ‘लोकसेवा हक्क दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त अकोला तालुक्यातील कोळंबी ग्रामपंचायतीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी भेट देत ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा आढावा घेतला.

Zilla Parishad CEO

लोकसेवा हक्क दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी: जिल्हा परिषद शाळेत केले वृक्षारोपण

अकोला : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत  २८ एप्रिल हा ‘लोकसेवा हक्क दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त अकोला तालुक्यातील कोळंबी ग्रामपंचायतीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी भेट देत ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी सीईओ मेश्राम यांनी ग्रामपंचायतीमार्फत अधिनियमांतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती ग्रामपंचायत अधिकारी व सेवा केंद्र चालकांकडून जाणून घेतली. नागरिकांना विविध सेवा विहित मुदतीत दिल्या जात असल्याचे तसेच ग्रामपंचायतीकडे एकही अर्ज प्रलंबित नसल्याचे ऑनलाइन अहवालातून स्पष्ट झाल्याने त्यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. तसेच ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मार्फत नागरिकांना विविध दाखले व बँकिंग सेवा प्रभावीपणे पुरविल्या जात असल्याबद्दल समाधान व्यक्त करून ग्रामपंचायत प्रशासनाचे अभिनंदन केले. यानंतर अनिता मेश्राम यांनी जिल्हा परिषद शाळेला सदिच्छा भेट देत परिसरात वृक्षारोपणही केले. या कार्यक्रमाला सहाय्यक गटविकास अधिकारी हरिनारायण परिहार, जिल्हाध्यक्ष रवी काटे, सरपंच डॉ. सचिन चक्रनारायण, माजी पंचायत समिती सदस्य बबनराव इंगळे, ग्रामपंचायत अधिकारी विनोद सोंनवणे, ग्रामविकास अधिकारी बबनराव सदांशीव, तसेच जीवन बोबडे, रफिक शाह, संतोष झगडे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top