Mahabreaking

[breaking_news]

Preparations for Census :जनगणना २०२७ पूर्वतयारीला वेग; देऊळगाव राजात प्रगणक-पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरू

Preparations for Census :जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीला गती देण्यासाठी देऊळगाव राजा तहसील कार्यालयांतर्गत प्रगणक व पर्यवेक्षकांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीरे घेण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा २३ ते २५ एप्रिल दरम्यान पार पडला असून, दुसरा टप्पा २७ एप्रिलपासून सुरू झाला आहे.

Preparations for Census

गजानन तिडके

देऊळगाव राजा :  जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीला गती देण्यासाठी देऊळगाव राजा तहसील कार्यालयांतर्गत प्रगणक व पर्यवेक्षकांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीरे घेण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा २३ ते २५ एप्रिल दरम्यान पार पडला असून, दुसरा टप्पा २७ एप्रिलपासून सुरू झाला आहे.

या प्रशिक्षणात केवळ सैद्धांतिक माहितीपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष क्षेत्रीय प्रात्यक्षिकालाही प्राधान्य देण्यात आले. तालुक्यातील कुंभारी येथे प्रत्यक्ष कुटुंबाला भेट देत जनगणना प्रक्रिया कशी पार पाडावी, याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणार्थींना दाखवण्यात आले. या कार्यक्रमाला तहसीलदार वैशाली डोंगरजाळ आणि निवासी नायब तहसीलदार संतोष मुंडे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. जनगणनेचे राष्ट्रीय विकासातील महत्त्व, माहिती संकलनाची अचूक पद्धत, तसेच तांत्रिक कार्यपद्धती याविषयी सखोल मार्गदर्शन या प्रशिक्षणादरम्यान करण्यात येत आहे.

प्रशिक्षणासाठी दोन बॅच करण्यात आल्या असून, एकूण १७७ प्रगणक आणि २९ पर्यवेक्षक सहभागी झाले आहेत. क्षेत्रीय प्रशिक्षक बालाजी कौशल्य, शिवप्रसाद राऊत, विष्णू वाघ, विजय तायडे, दयाशंकर वैद्य आणि दत्तात्रय जायभाय हे प्रशिक्षणार्थींना नवीन तंत्रज्ञानाचा वापर, माहिती नोंदविताना घ्यावयाची दक्षता आणि क्षेत्रीय कामकाजातील बारकावे समजावून सांगत आहेत.“जनगणना ही देशाच्या भविष्यातील विकास योजनांचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे प्रत्येक प्रगणकाने माहिती अत्यंत अचूकपणे व जबाबदारीने नोंदवणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी केले.दरम्यान, या प्रशिक्षणासाठी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध परिश्रम घेत असून, जनगणना २०२७ सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top