152 Students Appear : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ४थीची स्थानिक स्व. हुकूमचंदजी कोटेचा सहकार विद्या मंदिर येथे रविवारी (दि. २६ एप्रिल २०२६) येथे पार पडली. एकूण १५२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. गट शिक्षणाधिकारी श्रीकृष्ण सपकाळ यांनी भेट देवून परीक्षा केंद्राची पाहणी केली.

गजानन भालेकर
देऊळगाव मही : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ४थीची स्थानिक स्व. हुकूमचंदजी कोटेचा सहकार विद्या मंदिर येथे रविवारी (दि. २६ एप्रिल २०२६) येथे पार पडली. एकूण १५२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. गट शिक्षणाधिकारी श्रीकृष्ण सपकाळ यांनी भेट देवून परीक्षा केंद्राची पाहणी केली.
या परीक्षेचे आयोजन मुख्याध्यापक प्रकाश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. केंद्र संचालक व पर्यवेक्षक आप्पाराव खेडेकर यांच्या नियोजनामुळे संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडली. परीक्षेचा आढावा घेण्यासाठी पंचायत समिती देऊळगाव राजा येथील गटशिक्षणाधिकारी श्रीकृष्ण सपकाळ यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांनी परीक्षा केंद्राला भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी गणेश चव्हाण यांच्यासह सर्व पर्यवेक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या समन्वयामुळे परीक्षा कोणत्याही अडचणीशिवाय पार पडली. शिस्त, नियोजन आणि समन्वय यांच्या जोरावर ही शिष्यवृत्ती परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे समाधान शाळा प्रशासनाने व्यक्त केले.

