Mahabreaking

[breaking_news]

Truck  overturns : केळीने भरलेला ट्रक उलटला; दोन ठार, सहा गंभीर जखमी

Truck  overturns : केळीने भरलेला ट्रक उलटल्याने दाेन जण जागीच ठार झाले तर सहा जण गंभीर जखमी झाले. ही घटना टुनकी ते साेनाळा रस्त्यावर शनिवारी रात्री घडली.  
accident
टुनकी-सोनाळा रस्त्यावर भीषण अपघात
 संग्रामपूर : केळीने भरलेला ट्रक उलटल्याने दाेन जण जागीच ठार झाले तर सहा जण गंभीर जखमी झाले. ही घटना टुनकी ते साेनाळा रस्त्यावर शनिवारी रात्री घडली.
संग्रामपूर तालुक्यातील ग्राम टुनकीकडून केळी घेऊन ट्रक सोनाळामार्गे आकोटकडे जात हाेता. दरम्यान, टुनकी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला.या अपघातात ट्रकमधील दाेन जण जागीच ठार तर झाले तर सहा जण गंभीर जखमी झाल. घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, सोनाळा येथे दाखल करण्यात आले. त्यापैकी तीन गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांसह सर्व जखमी अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. घटनेचा पुढील तपास सोनाळा पोलिस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top