71 teachers of the district: गत सहा वर्षांतील जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांचा गौरव समारंभ बुधवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२५रोजी बुलढाणा येथील गरदे वाचनालय सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

बुलढाणा : गत सहा वर्षांतील जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांचा गौरव समारंभ बुधवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२५रोजी बुलढाणा येथील गरदे वाचनालय सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
केंद्रीय राज्यमंत्री आणि बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव तसेच केंद्रीय राज्यमंत्री आणि रावेर मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव हे भूषविणार आहेत.
सन २०१९ ते २०२५ या कालावधीत जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या ७१ शिक्षकांना या कार्यक्रमात शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सह-पालकमंत्री संजय सावकारे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, विधान परिषद सदस्य संजय खंडेलवाल, किरण सरनाईक, धीरज लिंगाडे, तसेच विधानसभा आमदार चैनसुख संचेती, संजय कुटे, श्वेता महाले, संजय गायकवाड, मनोज कायंदे आणि सिद्धार्थ खरात उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्यासह जिल्ह्यातील विविध मान्यवर, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

