Mahabreaking

[breaking_news]

Married Woman Harassed :विवाहितेचा छळ, मारहाण आणि घराबाहेर काढले; देऊळगाव राजात पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा

Married Woman Harassed : विवाहित महिलेचा छळ, मारहाण व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी पतीसह सहा जणांविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कौटुंबिक अत्याचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Married Woman Harassed

गजानन तिडके

देऊळगाव राजा : विवाहित महिलेचा छळ, मारहाण व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी पतीसह सहा जणांविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कौटुंबिक अत्याचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सायली प्रशांत केवट (वय २९, रा. पंचवटी, नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यानुसार, आरोपी प्रशांत शांतीलाल केवट (पती), शांतीलाल उमरासिंग केवट (सासरे), अन्नपूर्णा शांतीलाल केवट (सासू), कामिनी केवट (मोठी नणंद), प्रियंका रेड्डी (लहान नणंद) व सतीश रेड्डी (नणंदेचा पती) यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८(अ), ५०४, ५०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, मार्च २०२२ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत फिर्यादीला सासरी मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागला. घरातील कामे करून घेत असताना वारंवार पैशांची मागणी करण्यात येत होती. मागणी पूर्ण न झाल्यास पतीकडून मारहाण करण्यात येत होती तसेच जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे. याशिवाय, इतर आरोपींनीही शिवीगाळ करून धमक्या दिल्या व अखेरीस फिर्यादीला घराबाहेर काढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या महिलेन अखेर पोलीस ठाण्यात धाव घेत न्याय मागितला. सदर गुन्हा २४ एप्रिल २०२६ रोजी नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस कर्मचारी भास्कर सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या प्रकरणात संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.दरम्यान, महिलांवरील कौटुंबिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने अशा प्रकरणांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top