Mahabreaking

[breaking_news]

5 kg of Ganja :५ किलो गांजासह अल्पवयीन ताब्यात, देऊळगाव राजात खळबळ

5 kg of Ganja :देऊळगाव राजा पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ५.०५० किलो गांजा जप्त केला आहे.  या प्रकरणी एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

5 kg of Ganja

 एनडीपीएस अंतर्गत मोठी कारवाई; १.११ लाखांचा मुद्देमाल जप्त

गजानन तिडके

देऊळगाव राजा : देऊळगाव राजा पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ५.०५० किलो गांजा जप्त केला आहे.  या प्रकरणी एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास टाकरखेड भागिले शिवारातील गजानन महाराज हॉटेल समोर ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक राजकुमार हनमत मोहोळकर यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तेथे संशयास्पद हालचाली करत असलेल्या एका युवकाची झडती घेतली असता त्याच्याकडे गांजासदृश अंमली पदार्थ आढळून आला. तपासणीदरम्यान एकूण ५.०५० किलो गांजा जप्त करण्यात आला. या मुद्देमालाची बाजारातील अंदाजे किंमत सुमारे १ लाख १ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच आरोपीकडून एक मोबाईल फोन (किंमत सुमारे १० हजार रुपये) देखील जप्त करण्यात आला असून, एकूण १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला आहे.

जप्त केलेल्या पदार्थातून प्रत्येकी १०० ग्रॅमचे तीन नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. कारवाईदरम्यान फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने घटनास्थळ सुरक्षित करण्यात आले तसेच संपूर्ण प्रक्रियेचे छायाचित्रण करण्यात आले. अधिकृत वजन काट्याद्वारे मुद्देमालाचे वजन नोंदविण्यात आले.

या प्रकरणी अकोला शहरातील १७ वर्षीय संशयिताविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा २४ एप्रिल रोजी नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष वाघ इतर कर्मचारी करत आहे. देऊळगाव राजा पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top