Encroachments : शहरातील नगर पालिकेच्या हद्दीतील सन २०११ पूर्वीची अतिक्रमणे नियमाकुल होणार आहेत. याविषयी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे दि. १६ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शिवसेना उपनेते व बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बाळापूर नगर परिषद हद्दीतील २०११ पूर्वीची अतिक्रमणे नियमाकुल करण्यासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
ज़ाकिर अहमद
बाळापुर : शहरातील नगर पालिकेच्या हद्दीतील सन २०११ पूर्वीची अतिक्रमणे नियमाकुल होणार आहेत. याविषयी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे दि. १६ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शिवसेना उपनेते व बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बाळापूर नगर परिषद हद्दीतील २०११ पूर्वीची अतिक्रमणे नियमाकुल करण्यासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.
बैठकीदरम्यान बाळापूर शहरातील २०११ पूर्वीची अतिक्रमणे नियमाकुल करण्याच्या प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अतिक्रमणधारकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी संबंधित प्रशासनाला आवश्यक प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देत येत्या १० मे २०२६ पर्यंत अतिक्रमणधारकांना नियमाकुल करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीला बाळापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष डॉ. आफरीन परवीन मोहम्मद ज़मीर, उपाध्यक्ष सुरेंद्र धोपटे, बाळापूरचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी तसेच नगररचना विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

