Mahabreaking

🔴 BREAKING
Parents Meeting  :न.प. उर्दू प्राथमिक शाळा क्र. ६, फोर्ट येथे पालक सभेचे आयोजन! Encroachments :बाळापूर शहरातील सन २०११ पूर्वीची अतिक्रमणे होणार नियमाकुल Gas Cylinders :पातुरात गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांच्या रांगा, वाटपात अनियमिततेचा भाजपचा आरोप Speeding Cargo Vehicle :भरधाव मालवाहु वाहनाची दुचाकीस धडक, एक युवक जागीच ठार Rejects No-Confidence Motion :खैरव – बारलिंगा गट ग्रामपंचायतच्या सरपंचाविरुद्धचा अविश्वास ग्रामसभेने फेटाळला Sand Mafia  :खडकपूर्णा प्रकल्पात रेती माफियांचा हैदोस; अधिकारी कारवाईत, तर कनिष्ठ कर्मचारी मलाई खाण्यात दंग? Parents Meeting  :न.प. उर्दू प्राथमिक शाळा क्र. ६, फोर्ट येथे पालक सभेचे आयोजन! Encroachments :बाळापूर शहरातील सन २०११ पूर्वीची अतिक्रमणे होणार नियमाकुल Gas Cylinders :पातुरात गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांच्या रांगा, वाटपात अनियमिततेचा भाजपचा आरोप Speeding Cargo Vehicle :भरधाव मालवाहु वाहनाची दुचाकीस धडक, एक युवक जागीच ठार Rejects No-Confidence Motion :खैरव – बारलिंगा गट ग्रामपंचायतच्या सरपंचाविरुद्धचा अविश्वास ग्रामसभेने फेटाळला Sand Mafia  :खडकपूर्णा प्रकल्पात रेती माफियांचा हैदोस; अधिकारी कारवाईत, तर कनिष्ठ कर्मचारी मलाई खाण्यात दंग?

Gas Cylinders :पातुरात गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांच्या रांगा, वाटपात अनियमिततेचा भाजपचा आरोप

Gas Cylinders :शहरात गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडर ग्राहकांना मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातच गॅस सिलिंडर वाटपात अनियमितता होतअ असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे पातूर मंडळ अध्यक्ष गणेश गाडगे यांनी  राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी (अकोला) यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

Gas Cylinders

पातूर : शहरात गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडर ग्राहकांना मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातच गॅस सिलिंडर वाटपात अनियमितता होतअ असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे पातूर मंडळ अध्यक्ष गणेश गाडगे यांनी  राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी (अकोला) यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

गाडगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित एजन्सीकडून शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने गॅस सिलेंडरची विक्री केली जात आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी, चौकात वाहने उभी करून धोकादायक पद्धतीने सिलेंडरचे वितरण करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.  ग्राहकांनी आगाऊ बुकिंग करूनही त्यांना वेळेत सिलेंडर मिळत नसून, अधिक पैसे देणाऱ्यांना प्राधान्य दिले जात असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. सिलेंडरची चढ्या दराने विक्री होत असल्याचा आरोप ग्राहकांकडून सातत्याने केला जात आहे.

याशिवाय, एजन्सीच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून ग्राहकांसाठी कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. काही सिलेंडरचे वजन कमी असल्याच्या तक्रारीदेखील समोर आल्या असून, यामुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र नाराजी निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची तात्काळ व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गणेश गाडगे यांनी दिला आहे. तसेच ग्राहकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी संबंधित एजन्सीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top