Mahabreaking

🔴 BREAKING
Census Preparations Complete: जनगणनेची तयारी पूर्ण; नागरिकांनी ऑनलाइन स्व-गणनेत सहभागी व्हावे : डोंगरजाळ   Robbery Case :बायगाव बु. येथील जबरी चोरीचा उलगडा; तिघे गजाआड, लाखोंचा मुद्देमाल जप्त  illegal Kharra :कुरुम येथे अवैध खर्रा तयार करुन विक्री करणारे तिघे गजाआड Samata Parva :बार्शीटाकळीत भीम गीतांचा समता पर्व कार्यक्रम;गितांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार   Bhim Jayanti! :बार्शीटाकळी शहरात भीम जयंती निमित्त विविध उपक्रम ! Saint Goroba Kaka Kumbhar :साखरखेर्डा येथे संत गोरोबा काका कुंभार यांना अभिवादन Census Preparations Complete: जनगणनेची तयारी पूर्ण; नागरिकांनी ऑनलाइन स्व-गणनेत सहभागी व्हावे : डोंगरजाळ   Robbery Case :बायगाव बु. येथील जबरी चोरीचा उलगडा; तिघे गजाआड, लाखोंचा मुद्देमाल जप्त  illegal Kharra :कुरुम येथे अवैध खर्रा तयार करुन विक्री करणारे तिघे गजाआड Samata Parva :बार्शीटाकळीत भीम गीतांचा समता पर्व कार्यक्रम;गितांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार   Bhim Jayanti! :बार्शीटाकळी शहरात भीम जयंती निमित्त विविध उपक्रम ! Saint Goroba Kaka Kumbhar :साखरखेर्डा येथे संत गोरोबा काका कुंभार यांना अभिवादन

 Bhim Jayanti! :बार्शीटाकळी शहरात भीम जयंती निमित्त विविध उपक्रम !

Bhim Jayanti! :शहरातील बौद्ध बांधवांच्या वतीने विविध सामाजिक संघटनांनी भीम जयंती निमित्त विविध उपक्रम राबविले. यामध्ये गौतम नगर वार्ड क्रमांक ११ मधील बुद्ध विहारात घेण्यात आलेल्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भाषण व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

 Bhim Jayanti!

बार्शीटाकळी :– शहरातील बौद्ध बांधवांच्या वतीने विविध सामाजिक संघटनांनी भीम जयंती निमित्त विविध उपक्रम राबविले. यामध्ये गौतम नगर वार्ड क्रमांक ११ मधील बुद्ध विहारात घेण्यात आलेल्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भाषण व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ४७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विजेत्या स्पर्धकांना स्टडी टेबल व सहभागी स्पर्धकांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. हा उपक्रम नगरसेविका आम्रपाली नागसेन इंगोले ,भीम क्रांती व्यायामशाळा व विशाखा महिला उपासिका संघ यांच्या वतीने राबविण्यात आला. शहरातील पंचायत समिती परिसरात असलेल्या भिमवाटिकेत करूणाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था बार्शीटाकळीच्या वतीने द्वारा आयोजित समता पर्व या भीम गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका विधीज्ञ नीलू सराटे व रंजीताताई जवंजाळ यांनी भीम गीत गायनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. विशेष म्हणजे बाबासाहेबांना संगीतमय मानवंदना देण्यासाठी निलू सराटे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन केले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top