31 Students from Januna : बुलढाणा तालुक्यामधील सीमेवर असणारे व डोंगर भागात असणाऱ्या जनुना गावात गत दोन ते तीन वर्षात तब्बल ३१ विद्यार्थ्यांनी शासकीय नोकरी मिळवली आहे. या विद्यार्थ्यांचा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत जनुना द्वारा सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांच्या आई वडीलांचाही सत्कार करण्यात आला.

पंडित सावळे
मासरूळ : बुलढाणा तालुक्यामधील सीमेवर असणारे व डोंगर भागात असणाऱ्या जनुना गावात गत दोन ते तीन वर्षात तब्बल ३१ विद्यार्थ्यांनी शासकीय नोकरी मिळवली आहे. या विद्यार्थ्यांचा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत जनुना द्वारा सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांच्या आई वडीलांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी डॉ.अमिता अजित पवार होत्या तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये धाड पोलीस ठाणेदार भोस , प्रमोद ढोमणे पोलीस पाटील, सचिन जाधव ग्रामपंचायत अधिकारी ,योगेश मुळे कोषाध्यक्ष ग्रामपंचायत अधिकारी सोसायटी , योगेश सुरडकर तालुका समन्वयक व गावचे मा सरपंच तथा प्रशासक अनिता प्रमोद ढोमणे, माजी सरपंच प्रवीण पाटील ,टायगर बारवाल मा. उपसरपंच, तंटामुक्ती माजी अध्यक्ष भगवान नरोटे, अंबादास सपकाळ, राजपूत , पाटील ,जि .प. मुख्याध्यापक देवकर, पवार, ग्रामसेवक लहासे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. जे 31 विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू झाली आहे अशा विद्यार्थ्यांची व पालकांचे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी नवोदय परीक्षा व एनएमएस परीक्षेमध्ये यश संपादन केले, अशा विद्यार्थ्यांचा तसेच जिल्हा परिषद शाळा येथील शिक्षकांचा सत्कार सोहळा घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असणाऱ्या मान्यवरांनी आपल्या मनोकातून विद्यार्थी व पालकांचे स्वागत केले. ढोमणे यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले कार्यक्रमाला अध्यक्ष लाभलेल्या पवार यांनी विद्यार्थ्यांनी जे यश प्राप्त केले आहे तसेच त्यांच्या मेहनतीचे व पालकांनी दिलेल्या सहकार्याचे अभिनंदन केले. गावाने जो उपक्रम आयोजित केला आहे. असे उपक्रम प्रत्येक गावामध्ये घेण्यात यावे जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये एक जिद्द व भविष्यासाठी आपल्याला काय करायचं आहे या यासाठी त्याचा फायदा होईल हे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन चव्हाण , प्रास्ताविक लहासे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन ग्रामपंचायत जनुना व नितीन ढोमणे यांच्या संकल्पनेतून झाले. आभार देवकर यांनी केले कार्यक्रमाला गावातील मंडळी तसेच विद्यार्थी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.

