the Indian Constitution :सध्याच्या काळात आपल्या देशाचा कणा असलेले भारतीय संविधान हे धोक्यात आल्याचे दिसते. त्यामुळे आंबेडकरी समुदायातील तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अकोला येथील ॲड. आकाश हिवराळे यांनी केले.

ॲड. आकाश हिवराळे यांचे प्रतिपादन: वरखेडमध्ये समतापर्व 2026 चे आयोजन
वरखेड (तिवसा) : सध्याच्या काळात आपल्या देशाचा कणा असलेले भारतीय संविधान हे धोक्यात आल्याचे दिसते. त्यामुळे आंबेडकरी समुदायातील तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अकोला येथील ॲड. आकाश हिवराळे यांनी केले.
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त तिवसा तालुक्यातील वरखेड गावात समतापर्व २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. ते ‘भारतीय संविधान व आंबेडकरी तरुणांची भूमिका’ या विषयावर व्याख्यान देताना बोलत होते.
आपल्या देशात भारतीय संविधान नसते तर आपल्यावर अन्याय अत्याचार झाले असते. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचे रक्षण करावे लागणार आहे,असेही त्यांनी म्हटले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून पत्रकार पवन गवई, सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोलाचे माजी जिल्हाध्यक्ष अमोल शिरसाट, विशाल गवई यांच्यासह वरखेड गावातील विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सागर भवते, सुनील गडलिंग, पंकज गडलिंग, रवी मनोहर, चेतन लोणारे, सुमेध दिघाडे, स्वप्निल जवंजाळ, प्रफुल गडलिंग, प्रशिक चव्हाण, यांच्यासह रमाई महिला मंडळ, तथा ग्रामातील संविधान प्रेमी बांधव व समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
समतापर्व क्रांतीचे बीज
वरखेड गावातील समतापर्वाचे आयोजन हे एक क्रांतीचे बीज आहे. येणाऱ्या काळात या समतापर्वाचा विस्तार होणार यामध्ये दुमत नाही. भारतीय संविधानाचे जतन करण्यासाठी युवकांनी घेतलेला पुढाकार हा कौतुकास्पद असल्याचे मत पत्रकार पवन गवई यांनी यावेळी व्यक्त केले.

