Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले

Internal Fissures Erupt within Shinde Sena : देऊळगाव राजा तालुक्यात शिवसेनेच्या (शिंदे गट) दोन गटातील मतभेदाचा आढावा बैठकीत उद्रेक झाला. १५ एप्रिल रोजीहॉटेल वृंदावनच्या सभागृहात झालेल्या बैठकीत आजी माजी पदाधिकारी भिडले.  पक्षांतर्गत एकमेकांवर कुरघोडी तसेच श्रेयवादाचे पर्यवसान शाब्दिक चकमकीनंतर राड्यात झाल्यामुळे याची खमंग चर्चा सिंदखेडराजा मतदारसंघात ऐकावयास मिळत आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Internal Fissures Erupt within Shinde Sena

देऊळगाव राजातील बैठकीत राडा; आरोप प्रत्यारोपांनी गाजली सभा, मतभेद आले चव्हाट्यावर

गजानन तिडके

देऊळगाव राजा : देऊळगाव राजा तालुक्यात शिवसेनेच्या (शिंदे गट) दोन गटातील मतभेदाचा आढावा बैठकीत उद्रेक झाला. १५ एप्रिल रोजीहॉटेल वृंदावनच्या सभागृहात झालेल्या बैठकीत आजी माजी पदाधिकारी भिडले.  पक्षांतर्गत एकमेकांवर कुरघोडी तसेच श्रेयवादाचे पर्यवसान शाब्दिक चकमकीनंतर राड्यात झाल्यामुळे याची खमंग चर्चा सिंदखेडराजा मतदारसंघात ऐकावयास मिळत आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नवनियुक्त जिल्हा संपर्कप्रमुख संजय सोनार यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या दोन गटांतील आपसातील मतभेद चव्हाट्यावर आले. स्थानिक जालना रोडवरील हॉटेल वृंदावनच्या सभागृहात बुधवारी (१५ एप्रिल) नवनियुक्त पदाधिकारी तसेच स्थानिक पातळीवरील बूथ एजंटांना मार्गदर्शन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सदर बैठकीची माहिती न देता विशिष्ट पदाधिकाऱ्यांनाच घेऊन बैठक बोलावण्यात आल्याचा आरोप माजी उपजिल्हाप्रमुख दीपक बोरकर यांनी केला आहे. बोरकर तसेच तालुकाप्रमुख अनिल चित्ते यांची काही महिन्यांपूर्वी कोणतेही कारण न सांगता पदे काढून घेण्यात आल्याचे संबंधित गटाकडून सांगण्यात आले.   दोन गटांपैकी एका गटाने माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या राजकीय कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने वातानुकूलित हॉलमध्ये गदारोळ झाला आणि शिवसेनेतील अंतर्गत राजकीय पारा अचानक वाढला. दरम्यान, एकमेकांवर धावून गेलेल्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपल्याने शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

याचा सविस्तर मागोवा घेतला असता, देऊळगाव राजा येथे पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्याशी युती करण्यात आली होती. याच युतीला माजी उपजिल्हाप्रमुख दीपक बोरकर आणि तालुकाप्रमुख अनिल चित्ते यांनी प्रखर विरोध दर्शविला होता. त्यामुळेच त्यांची जिल्हा उपप्रमुख आणि तालुकाप्रमुख ही पदे रातोरात काढण्यात आली आणि त्या ठिकाणी दुसऱ्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

गेल्या पंधरा वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठपणे काम करत असताना आमच्यावर अन्याय का, असा प्रश्न त्यांनी त्यावेळी उपस्थित केला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून पालिका निवडणुका पार पडल्या आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. याचे सविस्तर विश्लेषण संबंधित पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव यांना सांगितले होते. त्यांनी योग्य वेळी निर्णय घेऊ, असे सूतोवाच केल्याचे सांगण्यात आले.

शहरातील हॉटेल वृंदावन येथे शिवसेनेची आढावा बैठक माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच नवनियुक्त बुलढाणा जिल्हा लोकसभा संपर्कप्रमुख संजय सोनार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. बैठकीत जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषी जाधव, महिला नेत्या भाग्यश्री खेडेकर, नवनिर्वाचित नगरसेवक यांच्यासह तालुका व शहरातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

सदर बैठकीत जिल्हाप्रमुख मापारी यांचे भाषण सुरू असताना शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख दीपक बोरकर व माजी तालुकाप्रमुख अनिल चित्ते यांच्यासह ५० ते ६० पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेना नेते एकनाथ शिंदे व केंद्रीय मंत्री खासदार प्रतापराव जाधव यांचा जयघोष करीत सभागृहात दाखल झाले. त्यावेळी बैठकीला संबोधित करणाऱ्या जिल्हाप्रमुखांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला.

यावेळी संतप्त माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीचे निमंत्रण नसल्याचे कारण देत थेट माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केला. यावेळी सदर बैठक ही केवळ पदाधिकाऱ्यांची असल्याचे खेडेकर गटाकडून सांगण्यात आले. तर खासदार प्रतापराव जाधव समर्थक असलेल्या माजी पदाधिकाऱ्यांनी बैठकीचे निमंत्रण नसल्याबद्दल संतप्त भावना व्यक्त केल्याने हॉलमध्ये चांगलाच गदारोळ झाला.

दोन्ही गटांतील पदाधिकारी व माजी पदाधिकारी एकमेकांवर धावून गेल्याने काही काळ वातानुकूलित हॉलमधील तापमान वाढले होते. या घटनेनंतर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मधील गटबाजी चव्हाट्यावर आली असून, माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांचा गट व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा गट समोरासमोर उभा ठाकला आहे. दरम्यान, राडा करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, या संदर्भात जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

 “काही दिवसांपूर्वी अमरावती येथे बूथ लेव्हल पदाधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासंदर्भात शिबिर पार पडले. त्याच अनुषंगाने देऊळगाव राजा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत फक्त सद्यस्थितीत तालुका व शहरस्तरीय पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. त्यामुळे सर्वांना बैठकीचे निमंत्रण देणे संयुक्तिक नव्हते. बैठकीत नवनियुक्त बूथ एजंटांच्या नियुक्तीसंदर्भात चर्चा होणार होती. मात्र, माजी पदाधिकाऱ्यांनी मनात राग धरून बैठक विस्कळीत करण्याच्या उद्देशाने घोषणाबाजी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर कळविण्यात येईल.”

डॉ. शशिकांत खेडेकर ,माजी आमदार

 

 “गेल्या पंधरा वर्षांपासून आम्ही शिवसेना पक्षाशी एकनिष्ठपणे राहून स्थानिक पातळीवर काम करत होतो. नगरपालिका निवडणुकीत केलेली अभद्र युती आम्हाला मान्य नव्हती. आम्ही त्याचा प्रखर विरोध केला. त्याचे फळ म्हणून आमच्याकडील पदे स्थानिक नेतृत्वाने काढून घेण्यास भाग पाडले. या संदर्भात आम्ही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे सविस्तर अहवाल सादर केला होता. स्थानिक बैठकीत आम्ही गेलो असताना जिल्हास्तरीय पदाधिकारी प्रथमच देऊळगाव राजात आले होते. त्यांचे स्वागत करणे हा आमचा प्रमुख उद्देश होता; परंतु आम्हाला त्यापासून रोखण्यात आल्याने वादविवाद झाला.”

दीपक बोरकर ,माजी जिल्हा उपप्रमुख

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top