Arif Malik : मलकापूर पांग्रा ग्रामपंचायतीअंतर्गत आज, दिनांक १० ऑक्टोबर रोजी झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी आरिफ खान आजम खान पठाण यांची अविरोध आणि एकमताने निवड करण्यात आली.

फकीरा पठाण
मलकापूर पांग्रा : मलकापूर पांग्रा ग्रामपंचायतीअंतर्गत आज, दिनांक १० ऑक्टोबर रोजी झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी आरिफ खान आजम खान पठाण यांची अविरोध आणि एकमताने निवड करण्यात आली.
ग्रामविकास अधिकारी, सरपंच, सदस्य व पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामविकास अधिकारी यांनी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या कार्याविषयी माहिती दिली. त्यानंतर इच्छुक उमेदवारांची नावे सुचविण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी गावकऱ्यांनी आरिफ खान आजम खान पठाण यांचे नाव एकमुखाने सुचविले आणि त्यांची निवड एकमताने जाहीर करण्यात आली.
आरिफ खान हे गावातील नवयुवक उद्योजक व व्यापारी वर्गातील प्रतिनिधी असून सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. सोशल मीडियावर नवयुवकांना संधी मिळावी, या मागणीच्या पार्श्वभूमीवर यंदा तंटामुक्ती समिती अध्यक्षपदावर नवयुवकाची निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांत आनंद व्यक्त होत आहे. यावेळी ग्रामविकास अधिकारी उद्धव गायकवाड , सरपंच पती यादव टाले, गुलशेर का खासाब, पोलीस पाटील सोनवणे ,गावंडे मामा, माजी सरपंच साबिर सेठ, ग्रामपंचायत सदस्य साबिर खान ,गोपू टाले ,बळी उगले ,निसार पटेल ,राजू साळवे ,आयुब खान पठाण ,ग्रामपंचायत सदस्य नामदेव उगले ,आरिफ टेलर ,जाफर पठाण ,जावेद खान, फिरोज खान ,अनिस खान समद खान, फकीरा कुरेशी शरद आटोळे , अमोल देशमुख, नाजील पटेल ,नासेर चाऊस ,शमी उल्ला खान ,रवि वायाळ ,पत्रकार भगवान साळवे ,पत्रकार पवन मगर ,पत्रकार फकीरा पठाण, साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने सेकंड पीआय सानप व बीट जमदार निवृत्ती पोफळे इत्यादी उपस्थित होते.

