Mahabreaking

🔴 BREAKING
Private Bus Accident;समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात; दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, २५ प्रवासी जखमी Census Preparations Complete: जनगणनेची तयारी पूर्ण; नागरिकांनी ऑनलाइन स्व-गणनेत सहभागी व्हावे : डोंगरजाळ   Robbery Case :बायगाव बु. येथील जबरी चोरीचा उलगडा; तिघे गजाआड, लाखोंचा मुद्देमाल जप्त  illegal Kharra :कुरुम येथे अवैध खर्रा तयार करुन विक्री करणारे तिघे गजाआड Samata Parva :बार्शीटाकळीत भीम गीतांचा समता पर्व कार्यक्रम;गितांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार   Bhim Jayanti! :बार्शीटाकळी शहरात भीम जयंती निमित्त विविध उपक्रम ! Private Bus Accident;समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात; दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, २५ प्रवासी जखमी Census Preparations Complete: जनगणनेची तयारी पूर्ण; नागरिकांनी ऑनलाइन स्व-गणनेत सहभागी व्हावे : डोंगरजाळ   Robbery Case :बायगाव बु. येथील जबरी चोरीचा उलगडा; तिघे गजाआड, लाखोंचा मुद्देमाल जप्त  illegal Kharra :कुरुम येथे अवैध खर्रा तयार करुन विक्री करणारे तिघे गजाआड Samata Parva :बार्शीटाकळीत भीम गीतांचा समता पर्व कार्यक्रम;गितांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार   Bhim Jayanti! :बार्शीटाकळी शहरात भीम जयंती निमित्त विविध उपक्रम !

Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान !

Revenue Grievance Redressal Camp :कोला जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या आदेशानुसार ,मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्या मार्गदर्शनात ,बार्शीटाकळी तालुका महसूल विभागाच्या वतीने राज्य शासनाच्या निर्देशानुसार धाबा येथे १० एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन करण्यात आले होते .

Revenue Grievance Redressal Camp

बबन इंगळे

बार्शीटाकळी : अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या आदेशानुसार ,मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्या मार्गदर्शनात ,बार्शीटाकळी तालुका महसूल विभागाच्या वतीने राज्य शासनाच्या निर्देशानुसार धाबा येथे १० एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन करण्यात आले होते .

शासनाने राजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिरांचे आयोजन करून सामान्य जनता, विद्यार्थी ,शेतकऱ्यांना व विविध योजनांच्या लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याची व याबाबत पाठपुरावा करून प्रक्रिया राबविण्यासाठी हा लोकाभिमुख उपक्रम सुरू केला आहे. याचा जनतेने लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार रविंद्र कापसीकर यांनी आपल्या भाषणातून केले तर तालुका कृषी अधिकारी संध्या करवा यांनी शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती करून उत्पन्न कसे वाढवता येईल यासह महाडीबीटी पोर्टल वरील विविध कृषी विषयक अनुदानित योजना आदींची माहिती दिली.यामध्ये विविध विभाग अंतर्गत सामान्य जनतेला, शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व दाखल्यांचे वाटप करण्यात आले. या समाधान शिबिरामध्ये प्रामुख्याने तहसीलदार रवींद्र कापशीकर, भूमी अभिलेख विभागाचे उप अधीक्षक दीपक ढगे ,तालुका कृषी अधिकारी संध्या करवा, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दीपक इंगळे, गजानन गावंडे, वसु ,वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण साबे, दुय्यम निबंधक अनिल काळे, पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप बिल्लेवार,महिला व बाल विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी, धाबा गावचे सरपंच नितीन वाकोडे ,नायब तहसीलदार अतुल सोनवणे ,अक्षय नागे, नितीन म्हात्रे, धाबा महसूल मंडळ अधिकारी दादाराव आठवले ,ग्राम महसूल अधिकारी मोहन चाफे, वनिता चव्हाण, राजू वैनकर, गिरिधर झळके, रचना धनाडे महसूल सेवक शशिकांत जगताप, पंकज भातकर, श्रीकृष्ण मागाडे, महा-ई-सेवा केंद्राचे संचालक उमेश करवले ,संगणक ऑपरेटर बलीवंत खंडारे ,राजेश डेरे आदींसह तालुक्यातील मंडळ अधिकारी ,ग्राम महसूल अधिकारी,  ग्राम महसूल सेवक, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक आदींची उपस्थिती होती. या शिबिराच्या स्थळी शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या जनजागृती साठी व माहिती करिता विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते.

पांदन व शेत रस्त्यांची प्रकरणांसह सामान्य जनता, शेतकरी यांची प्रकरणे निकाली काढण्यास महसूल विभागाकडून कमालीचा विलंब होत असल्याने धाबा येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन गालट व सचिन चांभारे यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत मुद्दा उपस्थित करून प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर रोष व्यक्त केला. चोहोगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना पावसाळ्यात चिखलातून वाट तुळवीत शाळेत जावे लागते . या रस्त्याची समस्या अनेक वर्षापासून प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्यासमोर आपबिती सांगितली. शिबिराचे प्रास्ताविक महसूलचे नायब तहसीलदार अक्षय नागे यांनी तर संचालन तहसील कार्यालयातील  विशाल काटोले यांनी केले.

शिबीरात ३१२ प्रमाणपत्रांचे केले वितरण

या शिबिरामध्ये संगणक विभाग ८७, आरोग्य विभाग ४२, संजय गांधी निराधार विभाग १६, पुरवठा विभाग ३०, आधार नोंदणी ०८, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग ३५, भूमी अभिलेख विभाग १३,कृषी विभाग ०७, उमेद अभियान ०३, शिक्षण विभाग ,शैक्षणिक प्रमाणपत्र ६२ आणि महसूल विभाग ३१२ आदींना प्रमाणपत्र व दाखले वितरणाची सेवा विद्यार्थी व लाभार्थ्यांना थेट शिबिर स्थळावर पुरविण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top