Mahabreaking

🔴 BREAKING
Accused who fled :युवकाचा खून करून पळणाऱ्या आरोपींना दोन तासात केले गजाआड World Homeopathy Day :बीबी ग्रामीण रुग्णालयात जागतिक होमिओपॅथी दिन उत्साहात साजरा Mahatma Phule Jayanti : डोणगावात रक्तदान करून महात्मा फुले जयंती साजरी Accused who murdered :सासू- मेहुणीची हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; मंगरुळपीर सत्र न्यायालयाचा निकाल Employee Assaulted :बसस्थानकातील सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण;एकाविरुध्द गुन्हा दाखल MLA Manoj Kayande :देऊळगाव राजातील जलकुंभाचे आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते लोकार्पण Accused who fled :युवकाचा खून करून पळणाऱ्या आरोपींना दोन तासात केले गजाआड World Homeopathy Day :बीबी ग्रामीण रुग्णालयात जागतिक होमिओपॅथी दिन उत्साहात साजरा Mahatma Phule Jayanti : डोणगावात रक्तदान करून महात्मा फुले जयंती साजरी Accused who murdered :सासू- मेहुणीची हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; मंगरुळपीर सत्र न्यायालयाचा निकाल Employee Assaulted :बसस्थानकातील सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण;एकाविरुध्द गुन्हा दाखल MLA Manoj Kayande :देऊळगाव राजातील जलकुंभाचे आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते लोकार्पण

Tipper Transporting :सिने स्टाईल पाठलाग करून अवैध रेती वाहतूक करणारे  टिप्पर पकडले

Tipper Transporting : खडकपूर्णा धरण परिसर तसेच नदी पात्रातून अवैध रेती उपसा तसेच वाहतूक करणाऱ्या तस्करावर महसूल विभागाने कार्यवाहीचा बडगा उगारला आहे.तरीही रेती माफीया अवैध उत्खनन करून वाहतुक करतात.10 एप्रिल रोजी देऊळगाव मही येथील खडकपूर्णा धरणाच्या कमानीकडे जात असलेले विना क्रमांकाचे टिप्पर महसूल पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले.  हे टिप्पर पोलीस स्टेशनला लावण्यात आले आहे.

Tipper Transporting

महसूल पथकाची देऊळगाव मही येथे धडक कारवाई

गजानन तिडके

  देऊळगाव राजा : खडकपूर्णा धरण परिसर तसेच नदी पात्रातून अवैध रेती उपसा तसेच वाहतूक करणाऱ्या तस्करावर महसूल विभागाने कार्यवाहीचा बडगा उगारला आहे.तरीही रेती माफीया अवैध उत्खनन करून वाहतुक करतात.10 एप्रिल रोजी देऊळगाव मही येथील खडकपूर्णा धरणाच्या कमानीकडे जात असलेले विना क्रमांकाचे टिप्पर महसूल पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले.  हे टिप्पर पोलीस स्टेशनला लावण्यात आले आहे.

अवैध रेती माफीयांविरुध्द महसूल विभागाने धडक मोहिम सुरू केली आहे. 10 एप्रिल रोजी महसूल पथक गस्तीवर असताना देऊळगाव मही येथील खडकपूर्णा धरणाच्या कमानीजवळ रेतीने भरलेला विना क्रमांकाचा टिप्पर वेगाने जात असल्याचे पथकाला आढळले. पथकाने कसलीही परवा न करता  पाठलाग करून सदर टिप्पर पकडले.या टिप्परसह चार ब्रास रेती आणि लाखो रुपये किमतीचे टिप्पर जप्त करून देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार वैशाली डोंगर जाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सायली जाधव, मंडळ अधिकारी विजय हिरवे, महसूल सेवक शरद काकडे यांच्या पथकाने पकडले. देऊळगाव राजा तालुक्यात गत काही दिवसांपासून रेती माफीयांचा हैदोस सुरू आहे. महसूल विभागाच्या कारवायानंतरही रेतीचे उत्खनन करून वाहतुक सुरू आहे. त्यामुळे, रेती माफीयाविरुध्द धडक कारवाई करण्याची गरज आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top