Mahabreaking

🔴 BREAKING
Accused who fled :युवकाचा खून करून पळणाऱ्या आरोपींना दोन तासात केले गजाआड World Homeopathy Day :बीबी ग्रामीण रुग्णालयात जागतिक होमिओपॅथी दिन उत्साहात साजरा Mahatma Phule Jayanti : डोणगावात रक्तदान करून महात्मा फुले जयंती साजरी Accused who murdered :सासू- मेहुणीची हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; मंगरुळपीर सत्र न्यायालयाचा निकाल Employee Assaulted :बसस्थानकातील सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण;एकाविरुध्द गुन्हा दाखल MLA Manoj Kayande :देऊळगाव राजातील जलकुंभाचे आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते लोकार्पण Accused who fled :युवकाचा खून करून पळणाऱ्या आरोपींना दोन तासात केले गजाआड World Homeopathy Day :बीबी ग्रामीण रुग्णालयात जागतिक होमिओपॅथी दिन उत्साहात साजरा Mahatma Phule Jayanti : डोणगावात रक्तदान करून महात्मा फुले जयंती साजरी Accused who murdered :सासू- मेहुणीची हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; मंगरुळपीर सत्र न्यायालयाचा निकाल Employee Assaulted :बसस्थानकातील सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण;एकाविरुध्द गुन्हा दाखल MLA Manoj Kayande :देऊळगाव राजातील जलकुंभाचे आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते लोकार्पण

House Catches Fire Due to Short Circuit :दगडवाडी मध्ये शॉर्टसर्किटमुळे घराला आग; घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट, लाखोंचे नुकसान

House Catches Fire Due to Short Circuit :तालुक्यातील चिखली रोडवर असलेल्या दगडवाडी येथे शुक्रवार 10 एप्रिल रोजी मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे अचानक घराला आग लागली.या आगीत घरातील सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्र रुप धारण केले. स्फोटामुळे घरावरील मोठ मोठे दगड आणि टिनपत्रे उडाले. हे दगड आणि टिनपत्रे लागल्याने सात जण जखमी झाले. अग्नीशमन दलाची गाडी वेळेवर आल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

House Catches Fire Due to Short Circuit

सात जण जखमी: अग्नीशमन बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला

गजानन तिडके  

 देऊळगावराजा : तालुक्यातील चिखली रोडवर असलेल्या दगडवाडी येथे शुक्रवार 10 एप्रिल रोजी मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे अचानक घराला आग लागली.या आगीत घरातील सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्र रुप धारण केले. स्फोटामुळे घरावरील मोठ मोठे दगड आणि टिनपत्रे उडाले. हे दगड आणि टिनपत्रे लागल्याने सात जण जखमी झाले. अग्नीशमन दलाची गाडी वेळेवर आल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

House Catches Fire Due to Short Circuit in Dagadwadi; Gas Cylinder Explodes, Causing Damage Worth Lakhs

दगडवाडी येथे शुक्रवारी मध्यरात्री घराला अचानक आग लागली. शेजारीच असलेले सौंदा उगलमुगले हे बाहेर लघुशंकेसाठी आले असता त्यांचा हा प्रकार लक्षात आला. लगेच त्यांनी आरडा- ओरड केल्याने शेजारी  घरातील काही सदस्य उठले . सरपंचाशी संपर्क केला सरपंच  पती यांनी लगेच पोलीस निरीक्षक  ब्रम्हा गिरी यांच्याशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. तसेच अग्निशामक दलाचे मागणी केली. पोलीस निरीक्षक  ब्रह्मगिरी  यांनी लगेच अग्निशामक गाडीला पाचारण केले आणि अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात अग्निशामक दलाची गाडी व त्यांची सर्व टीम गावात पोहोचली. तत्पूर्वी सुरुवातीला गावातील नागरिकांनी पाणी फेकून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.

House Catches Fire Due to Short Circuit in Dagadwadi; Gas Cylinder Explodes, Causing Damage Worth Lakhs

आग विझवण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानक घरातील असलेले गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घरावरचे तीन पत्रे व मोठमोठे दगडे फेकल्या गेली. मोठा आवाज झाल्याने एकच धावपळ ऊडाली त्यामुळे जे गावकरी मदत करत होते त्यांना दुखापत झाली. अनेक जण एकमेकांच्या अंगावर पडले तर कोणी रस्त्यावर पडले तर कोणाला टिन पत्र लागले तर कोणाला दगड लागले.  यामध्ये आर्यन शंकर घुगे याला डोक्याला जबर मार लागल्याने त्याला 18 टाके पडले तर बाकी किरकोळ जखमी झाले. लगेच अग्निशामक दलाची गाडी व पोलीस स्टेशनची गाडी त्या ठिकाणी घटनास्थळी हजर होऊन गावकरी व अग्निशामक त्याला सोबत आलेली टीम सर्वच कामाला लागले व आग आटोक्यात आणली या धावपळीत  आर्यन शंकर घुगे, सत्यभामा काशिराम उगलमुगले, चंद्रभागा छगन घुगे, गजानन बाजीराव घुगे, शारदा शिवाजी घुगे, शांताबाई कारभारी घुगे, संजय कारभारी घुगे आणि रंजना संतोष डोईफोडे आदी जखमी झाले.  अग्निशामक दल  वेळेवर पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. या आगीत घरातील धान्य आणि कागदपत्रे जळून खक झाले. या घटनमुळे कारभारी दिपाजी नागरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

गॅस सिलिंडरच्या स्फोटाने गावात खळबळ

घराला लागलेल्या आगीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या सिलिंडर स्फोटाच्या आवाजाने पूर्ण गावच जागी झाले. देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पीआय ब्रम्हागिर, अग्नीशमन दलाचे  ऑपरेटर भगवान मापारी व गावातील उपस्थित नागरिक तसेच  उगलमुगले यांची महत्त्वाची भूमिका बजावल्याने आगीवर तातडीने नियंत्रण मिळवता आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top