Speeding Car Crashes :भरधाव कारचा अपघात झाल्याने चालक जखमी झाल्याची घटना 9 एप्रिल रोजी रात्री १२ च्या सुमारास वाडेगाव अकोला मार्गावर येत असलेल्या नकाशी येथील नाल्यानजीक घडली.गंभीर जखमी झालेल्या चालकाला मध्यरात्री युवकांनी मदत करून जीवनदान दिले.

राहुल सोनोने
वाडेगाव: भरधाव कारचा अपघात झाल्याने चालक जखमी झाल्याची घटना 9 एप्रिल रोजी रात्री १२ च्या सुमारास वाडेगाव अकोला मार्गावर येत असलेल्या नकाशी येथील नाल्यानजीक घडली.गंभीर जखमी झालेल्या चालकाला मध्यरात्री युवकांनी मदत करून जीवनदान दिले.
नाकाशी नाल्या जवळ रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने व सबंधित ठेकेदार यांनी अर्धवट रस्ता ठेवल्याने व संबंधित प्रशासन विभागाचा भोंगळ कारभार वाहनधारकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा प्रकार घडत आहे.मध्य रात्रीच्या सुमारास बोलेरो गाडी क्रमांक एम एच१२ एक्स एच ५३१३ अकोला कडे जात असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने चालक केतन जाधव यांची गाडी सरळ झाडाला धडकली. याबाबत आवाज ऐकून नकाशी येथील भूषण काळे यांचा ट्रैक्टर बोलाऊन ती गाडी लोखंडी गजाच्या सहारे बांधून बाहेर काढली. जवळपास २ तास नंतर या गाडीला व चालकाला काढण्यास यश मिळाले. तसेच एवढ्या रात्रीला मदत करणारे त्यांच्या मागे असणारे धनेगावचे पोलिस पाटील प्रमोद लांडे,मनसे बाळापूर तालुका अध्यक्ष विनोद राहुडकार हर्षदीप सदार, कुणाल तायडे आदींनी मदत करून पुढील उपचारासाठी अकोला पाठविण्यात आले.
एक महिन्या आधी सुद्धा याच ठिकाणी रस्त्याअभावी मोटरसायकलचा अपघात होऊन हेलमेट असतांना पण मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. सबंधित विभागणार अर्धवट राहिलेला रस्ता सुरळीत करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

