Mahabreaking

[breaking_news]

Argument over TV remote :टीव्हीच्या रिमोटवरून वाद; एकास लोखंडी रॉडने मारहाण, जिवे मारण्याची धमकी

Argument over TV remote : टीव्हीचा रिमोट देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून जखमी करण्यात आले, तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २९ मार्च २०२६ रोजी घडली होती. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी 9 एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला आहे.

Argument over TV remote

देऊळगाव राजा :  टीव्हीचा रिमोट देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून जखमी करण्यात आले, तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २९ मार्च २०२६ रोजी घडली होती. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी 9 एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी  आश्विनी सूरज साळवे (वय २५, रा. समता कॉलनी, देऊळगाव राजा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचे पती सूरज साळवे हे २९ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजता लिंबारा परिसरातील देशी दारू दुकानाजवळ टीव्ही पाहत बसले होते. यावेळी आरोपी राजू मांटे (रा. भगवान बाबा कॉलनी, देऊळगाव राजा) हा तेथे आला आणि टीव्हीचा रिमोट मागू लागला. मात्र रिमोट न दिल्याच्या कारणावरून त्याने संताप व्यक्त करत सूरज साळवे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर हातातील लोखंडी रॉडने त्यांच्या पायावर वार करून त्यांना जखमी केले, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. याचवेळी आरोपीने जखमीला जिवे मारण्याची धमकी दिल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमीवर उपचार सुरू असून, घटनेनंतर फिर्यादी सौ. आश्विनी साळवे यांनी गुरुवारी रात्री पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी  आरोपी राजू मांटे विरुध्द  भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५२, ३५१(२)(३) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याची नोंद पोलीस हेडकॉन्स्टेबल काकड यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गीते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top