Mahabreaking

🔴 BREAKING
Speeding Car Crashes :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव कारचा अपघात; जखमी चालकाला मध्यरात्री  युवकांनी केली मदत Burglary in Aland Village :आळंद गावात घरफोडी; अज्ञात चोरट्यांनी दीड लाखांचे दागिणे केले लंपास Money Robbed :बँकेत पैसे जमा करायला निघालेल्या शेतकऱ्याचे २० हजार हिसकावले, दुचाकीची तोडफोड Argument over TV remote :टीव्हीच्या रिमोटवरून वाद; एकास लोखंडी रॉडने मारहाण, जिवे मारण्याची धमकी Medical Officers :साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला राज , दोन्ही वैष्णवी वैद्यकीय अधिकारी रुजू BJP Lodges Complaint :आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा; भाजपची साखरखेर्डा पोलिसांत तक्रार Speeding Car Crashes :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव कारचा अपघात; जखमी चालकाला मध्यरात्री  युवकांनी केली मदत Burglary in Aland Village :आळंद गावात घरफोडी; अज्ञात चोरट्यांनी दीड लाखांचे दागिणे केले लंपास Money Robbed :बँकेत पैसे जमा करायला निघालेल्या शेतकऱ्याचे २० हजार हिसकावले, दुचाकीची तोडफोड Argument over TV remote :टीव्हीच्या रिमोटवरून वाद; एकास लोखंडी रॉडने मारहाण, जिवे मारण्याची धमकी Medical Officers :साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला राज , दोन्ही वैष्णवी वैद्यकीय अधिकारी रुजू BJP Lodges Complaint :आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा; भाजपची साखरखेर्डा पोलिसांत तक्रार

BJP Lodges Complaint :आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा; भाजपची साखरखेर्डा पोलिसांत तक्रार

BJP Lodges Complaint : बुलढाणा येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार Sanjay Gaikwad यांनी केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल त्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुर देशपांडे यांनी आज साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून केली.

BJP Lodges Complaint

साखरखेर्डा : बुलढाणा येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार Sanjay Gaikwad यांनी केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल त्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुर देशपांडे यांनी आज साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून केली.

तक्रारीत म्हटले आहे की, आदिवासी आश्रमशाळेचे अध्यक्ष, माजी आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्याविषयी पत्रकार परिषदेत बोलताना, ते बुलढाण्याचे अशोक खरात असल्याचे गायकवाड यांनी म्हटले होते. यापूर्वीही गायकवाड यांनी पंतप्रधान Narendra Modi, मुख्यमंत्री Devendra Fadnavis, आमदार डॉ. संजय कुटे आणि आमदार श्वेता महाले यांच्याबद्दलही बेताल वक्तव्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

मात्र, यावेळी त्यांनी हद्दच केली असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. मागासवर्गीय आदिवासी समाजासाठी शिंदे यांनी आश्रमशाळा सुरू करून त्यांना हक्काचे शिक्षण उपलब्ध करून दिले. आज आदिवासी समाजातील मुले-मुली त्या शाळेत शिक्षण घेत आहेत. त्याच शाळेतील एका महिला कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मुलींची छेड काढल्याचा बिनबुडाचा आरोप करून विजयराज शिंदे यांची बदनामी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

केवळ शिंदे यांचीच नव्हे, तर भाजप पक्षाची आणि आदिवासी समाजाचीही बदनामी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा भाजप कार्यकर्त्यांनी निषेध केला असून, आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच, गुन्हा दाखल न केल्यास संपूर्ण जिल्ह्यात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुर देशपांडे, अमोल साखरे, शिवाजी वाघ, संतोष साळवे, एकनाथ खरात, अमोल अवचार, संदीप बुंधे, नारायण देशमुख, समाधान बंगाळे, शिवा कोरडे, सागर पाटील आणि बालाजी नाझरकर यांनी दिला आहे. ही तक्रार ठाणेदार गजानन करेवाड यांच्याकडे दाखल करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top