Mahabreaking

[breaking_news]

District Collector  :जिल्हाधिकारी उद्या बाळापुर दौर्‍यावर; जनसंवाद बैठकीत नागरिकांना समस्या मांडण्याचे आवाहन

District Collector  : जिल्हाधिकारी अकोला उद्या दिनांक ९ रोजी बाळापूर येथे भेट देणार असून विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा व आवश्यक मार्गदर्शन करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान प्रशासन व नागरिकांमधील संवाद वाढावा या उद्देशाने बाळापूर नगरपालिका सभागृहात जनसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

District Collector 

ज़ाकिर अहमद

बाळापूर : जिल्हाधिकारी अकोला उद्या दिनांक ९ रोजी बाळापूर येथे भेट देणार असून विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा व आवश्यक मार्गदर्शन करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान प्रशासन व नागरिकांमधील संवाद वाढावा या उद्देशाने बाळापूर नगरपालिका सभागृहात जनसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत नागरिकांना त्यांच्या परिसरातील विविध समस्या, अडचणी व मागण्या लेखी स्वरूपात जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळणार आहे. पाणीपुरवठा, रस्ते, वीज, शासकीय योजनांचा लाभ, महसूल, कृषी तसेच इतर विभागांशी संबंधित प्रश्न नागरिक थेट प्रशासनापुढे मांडू शकतील.
दरम्यान, संबंधित विभागांचे अधिकारी देखील उपस्थित राहणार असल्याने अनेक प्रश्नांवर तात्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तरी बाळापूर शहर व तालुक्यातील नागरिकांनी या जनसंवाद बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top