The Morna riverbed : भारतीय जनता पक्षाच्या 47 व्या वर्धापन दिनानिमित्त जनसंवाद अभियानाच्या माध्यमातून जनकल्याण कार्यक्रम तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या कामाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी विशेष अभियान राबवण्यात येत आहे. या विविध उपक्रमांतर्गंत संजय धोत्रे,आमदार गोवर्धन शर्मा यांच्या प्रेरणेने 12 एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे.या अभियानात नागरिकांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन आमदार रणधीर सावरकर यांनी केले आहे.

आमदार रणधीर सावरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी घेतला सक्रीय सहभाग
संजय तायडे
बोरगाव मंजू : भारतीय जनता पक्षाच्या 47 व्या वर्धापन दिनानिमित्त जनसंवाद अभियानाच्या माध्यमातून जनकल्याण कार्यक्रम तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या कामाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी विशेष अभियान राबवण्यात येत आहे. या विविध उपक्रमांतर्गंत माजी खासदार संजय धोत्रे,आमदार गोवर्धन शर्मा यांच्या प्रेरणेने 12 एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे.या अभियानात नागरिकांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन आमदार रणधीर सावरकर यांनी केले आहे. निमवाडी येथील गणेश घाट पासून भारतीय जनता पक्षाच्या वतीने ट्रॅक्टर जेसीबी मशीन तसेच पाचशे कार्यकर्ते विविध सामाजिक संघटना महानगरपालिकेतील सहकाऱ्याने जलकुंभी काढण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
अकोला शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीचा विकास साबरमतीच्या धर्तीवर करण्याचा प्रकल्प राज्य शासनाकडे प्रस्तावित असून काँग्रेस उबाठासेनेने प्रस्ताव नामंजूर केल्यामुळे पुन्हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तसेच लवकर केंद्र सरकारकडे डीपीआर पाठवण्यात येणार असून रोजगाराच्या संधी तसेच विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प केंद्र आणि राज्य सरकारचा असल्याचे आमदार सावरकर यांनी सांगितले. संजय धोत्रे यांनी 2001 मध्ये पाण्याची पातळी कमी झाल्यावर रेन हार्वेस्टिंग योजना राबवून शहरातील इंजिनिअर विविध संघटना आणि नागरिकांच्या सहकार्याने पाण्याची समस्या व मात केली होती. अकोला शहरातील आपली नदी आपली जबाबदारी या अभियानाअंतर्गत शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते भाजपा कार्यकर्ते यांच्या माध्यमातून हा अभियान सुरू झाला आहे यामध्ये सर्व सामाजिक संघटनेने सहभागी व्हावे असे आवाहन खासदार अनुप धोत्रे यांनी केले. स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या संकल्पनेतून हा अभियान राबविण्यात येत असून या अभियानाला जनतेचा पाठिंबा हेच भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीचे यश असल्याचे प्रतिपादन महापौर शारदाताई खेडकर यांनी केले. या अभियानात खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, अध्यक्ष जयंतराव मसने, मनपा सभापती विजय अग्रवाल, महापौर शारदाताई खेडकर आदींनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाला किशोर मांगटे पाटील,कृष्णा शर्मा,अमोल गोगे संजय गोटफोडे, आम्रपाली उपरवट, पवन महल्ले सागर शेगोकार संदीप गावंडे, अमोल मोहोकार तुषार भिरड,सागर शेगोकार, अमोल गिते, गोपाल मुळे, रणजित खेडकर, सतीश ढगे,संतोष पांडे,राजेंद्र गिरी सौ वैशाली शेळके, आरती घोगलिया चंदा शर्मा ऍड. कल्पना गोटफोडे, मंजुषा शेळके, प्राची काकड, विद्या खंडारे, रंजना विंचनकर, बबलू जगताप, डॉ राजु देशपांडे, डॉ अभय जैन डॉ किशोर मालोकार शरद तूरकर, नितीन ताकवाले,संदीप शेगोकार, विनोद मनवानी,किशोर वऱोकार, अमोल मोहोकार, विशाल इंगळे, हर्षद भांबेरे, संतोष डोंगरे, गजानन सोनोने दिलीप भरणे, संजय झाडोकार, धनंजय धबाले, सुनील बाठे सिद्धार्थ उपरवट हर्ष चौधरी, राजेश खेडकर पंडित हेमंत शर्मा जमीर खान भूषण इंदोरीय हेमंत सटवाले आदींसह इतरांनी सहभाग घेतला.

