2646 enumerators : जनगणना क्षेत्रीय प्रशिक्षक प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ नियोजनभवनात झाला. जनगणनेच्या कार्यासाठी तीन हजाराहून अधिक मनुष्यबळ लागणार असून, त्यानुसार नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, तसेच प्रशिक्षण सत्रांना प्रारंभ झाला आहे. जनगणनेसाठी ४४४ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

४४४ पर्यवेक्षकांची नियुक्ती ; क्षेत्रीय प्रशिक्षकांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीर
जाकीर अहमद
अकोला : जनगणना क्षेत्रीय प्रशिक्षक प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ नियोजनभवनात झाला. जनगणनेच्या कार्यासाठी तीन हजाराहून अधिक मनुष्यबळ लागणार असून, त्यानुसार नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, तसेच प्रशिक्षण सत्रांना प्रारंभ झाला आहे. जनगणनेसाठी ४४४ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जनगणना संचालनालय महाराष्ट्र व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी अकोला यांचे संयुक्त विद्यमाने जनगणना २०२७ क्षेत्रीय प्रशिक्षक यांच्या प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ झाला. निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी गजेंद्र मालठाणे, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले,तहसीलदार तथा मास्टर ट्रेनर वैभव फरतारे उपायुक्त प्रशासन मनपा तथा मास्टर ट्रेनर दिलीप जाधव, अधीक्षक श्याम धनमने यांच्या आदी उपस्थित होते.
मास्टर ट्रेनरकडून क्षेत्रीय प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर क्षेत्रीय प्रशिक्षक हे तालुक्याच्या ठिकाणी प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. तालुका प्रशिक्षण सत्रे २७ एप्रिल ते ८ दरम्यान होतील. जिल्ह्यातील सर्व तालुके, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रातील जनगणनेसाठी २ हजार ६४६ प्रगणक, तसेच ४४४ पर्यवेक्षक काम करतील.

