Mahabreaking

[breaking_news]

Resignation Spree :देऊळगाव राजा बाजार समितीत राजीनामा सत्र; सभापती, उपसभापती यांनी दिला राजीनामा

Resignation Spree :पश्चिम विदर्भातील प्रवेशद्वारावरील असलेल्या सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून शहराची ओळख आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पाठोपाठ सभापती यांनी सोमवार (ता. ६) आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नूतन सभापती आणि उपसभापती कोणाची वर्णी लागणार याकडे सध्या तालुका वास यांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान याच कालावधीमध्ये बाजार समितीवर संचालक असलेल्या संचालकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा केल्या जात आहे. परंतु त्याला अधिकृत दुजोरा अद्याप पर्यंत मिळालेला नाही. बाजार समितीच्या राजकारणात अनपेक्षित पणे गतिमान घडामोडी घडल्या आहे.

Resignation Spree

 नूतन सभापतीपदी कोणाची निवड चर्चेचा विषय ; बाजार समितीच्या राजकारणात अनपेक्षीत घडामोडी

गजानन तिडके 

देऊळगाव राजा :  पश्चिम विदर्भातील प्रवेशद्वारावरील असलेल्या सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून शहराची ओळख आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पाठोपाठ सभापती यांनी सोमवार (ता. ६) आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नूतन सभापती आणि उपसभापती कोणाची वर्णी लागणार याकडे सध्या तालुका वास यांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान याच कालावधीमध्ये बाजार समितीवर संचालक असलेल्या संचालकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा केल्या जात आहे. परंतु त्याला अधिकृत दुजोरा अद्याप पर्यंत मिळालेला नाही. बाजार समितीच्या राजकारणात अनपेक्षित पणे गतिमान घडामोडी घडल्या आहे.

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर गत तीन दशकापासून माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचे वर्चस्व आहे. दरम्यान ३४ महिन्यापूर्वी झालेल्या बाजार समिती संचालक पदाच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे समाधान भिकाजी शिंगणे यांची सभापती म्हणून अविरोध निवड करण्यात आली, तर त्यावेळ चे मित्रपक्ष असलेले शिवसेना उबाठाचे दादाराव भगवान खार्डे यांची उपसभापतीपदी वर्णी लागली. दोन वर्षाचा कालावधी उलटल्यावर अलीकडील काळात सभापती, उपसभापती यांच्या राजीनाम्याची चर्चा बाजार समितीच्या राजकीय वर्तुळात होती. मात्र ऐन वेळी राजीनामाच्या विषय काही न काही कारणास्तव पुढे ढकलल्या जात होता. दरम्यान दोन दिवसापूर्वी सभापती यांच्याकडे उपसभापती दादाराव खार्डे यांनी राजीनामा सोपविल्यानंतर ६ एप्रिल सोमवार रोजी सभापती समाधान शिंगणे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सादर केला. बाजार समिती सभापती व उपसभापती यांच्या राजीनाम्याच्या मागे माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचे आदेश असल्याची माहिती असून त्यांच्या आदेशानेच राजीनामा दिल्याची माहिती मिळत असली तरी स्थानिक आमदार मनोज कायंदे यांची भूमिका सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचे ठरणार असल्याचे राजकीय चर्चेचा विषय सद्यस्थितीत बनत आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top