Mahabreaking

🔴 BREAKING
Speeding Cargo Vehicle :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव मालवाहु उलटले; सुदैवाने जीवितहानी टळली District-Level Program :दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत उद्या गुढीपाडवा ,पट वाढवा जिल्हास्तरीय कार्यक्रम Prataprao Jadhav :सत्यशोधक चळवळ सुरू करुन सामाजिक क्रांती घडविण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले : प्रतापराव जाधव 1 quintal and 12 kg of ganja :एक क्विंटल १२ किलो गांजासह ५५ लाख ७८ हजारांचा एवज जप्त, दोन आरोपींना अटक one crore for cabin repairs :कॅबीन दुरुस्तीसाठी एक कोटी तर खुल्या नाट्यगृहासाठी केवळ पाच लाखांची तरतुद   Shocking :धक्कादायक! सेवानिवृत्तीला आलेल्या शिक्षकाचे विद्यार्थिनींबरोबर अश्लील चाळे Speeding Cargo Vehicle :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव मालवाहु उलटले; सुदैवाने जीवितहानी टळली District-Level Program :दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत उद्या गुढीपाडवा ,पट वाढवा जिल्हास्तरीय कार्यक्रम Prataprao Jadhav :सत्यशोधक चळवळ सुरू करुन सामाजिक क्रांती घडविण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले : प्रतापराव जाधव 1 quintal and 12 kg of ganja :एक क्विंटल १२ किलो गांजासह ५५ लाख ७८ हजारांचा एवज जप्त, दोन आरोपींना अटक one crore for cabin repairs :कॅबीन दुरुस्तीसाठी एक कोटी तर खुल्या नाट्यगृहासाठी केवळ पाच लाखांची तरतुद   Shocking :धक्कादायक! सेवानिवृत्तीला आलेल्या शिक्षकाचे विद्यार्थिनींबरोबर अश्लील चाळे

Children Bank notes :चिल्ड्रेन बँकेच्या नोटा देऊन लोकांची फसवणूक करणारी टोळी गजाआड

Children Bank notes :चिल्ड्रेन बँकेच्या नोटा देऊन लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मलकापुरात जेरबंद केले. पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन लाख एक हजार 700 रुपयांचा एवज जप्त करण्यात आला आहे.

Children Bank notes

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई : चार जणांना अटक, दोन लाख एक हजार रुपयांचा एवज जप्त

बुलढाणा : चिल्ड्रेन बँकेच्या नोटा देऊन लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मलकापुरात जेरबंद केले. पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन लाख एक हजार 700 रुपयांचा एवज जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मिडीयाचा वापर करुन कमी रुपयांच्या मोबदल्यात जास्त रुपांच्या नोटा देण्याचे आमिष व प्रलोभन दाखवून लोकांना फसवणूक केल्याच्या घटना घडत आहेत. या घटनांची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी अशा खोट्या भुलथापा व आमिषं देऊन लोकांची फसवणूक करणाऱ्या ईसमांचा शोध घेऊन त्यांचेवर कठोर कार्यवाही करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते. सदर अनुषंगाने पोनि  सुनिल अंबुलकर स्था.गु.शा. बुलढाणा यांनी अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदारांची पथके तयार करुन त्यांना वरिष्ठांच्या निर्देशांप्रमाणे कारवाई करणेबाबत सुचित केले होते.

सदर अनुषंगाने, दि.07/04/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, मलकापूर शहर परिसरात काही ईसम हे सोशल मिडीयाचा वापर करुन त्यावर 01 लाख रुपयांच्या मोबदल्यात 10 लाख रुपयांच्या नोटा देत असल्याची माहिती देऊन, लोकांना जास्त पैशांचे आमिष देऊन फसवणूक करीत आहेत. अशा माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मलकापूर शहरामध्ये सापळा रचून कार्यवाही केली. त्यामध्ये आरोपी   अमोल रमेशगोरे वय 25 वर्षे मलकापूर, भारत मधूकर वानखडे वय 25 रा. मलकापूर,   अविनाश सुनिल तायडे वय 22 रा. मलकापूर,   चेतन गुलाबराव पाटील वय 25 रा. महालखेडा ता.मुक्ताईनगर, जि. जळगांव यांना पकडले. ही कार्यवाही करतांना आरोपी यांनी कार्यवाही पथकावर हमला करुन पथकातील अधिकारी व अंमलदारांना किरकोळ जखमी केले. या कार्यवाही दरम्यान आरोपींच्या ताब्यातून ।) नगदी रोख 1500/-रु., 2) चिड्रेन बँक लिहलेल्या रक्कम 9,00,000/-रु.च्या नोटा किं.00/-रु., 3) लोखंडी चाकू-02 नग किं. 200/-रु., 4) मोबाईल 06 नग किं. 1,00,000/-रु., 5) ज्युपीटर मोपेड बाईक 02 नग किं. 1,00,000/-रु. असा एकूण 2,01,700/-रु.चा मुद्देमाल जप्त केला. सदर प्रकरणी, फिर्यादी पोउपनि. अविनाश जायभाये नेमणूक- स्था.गु.शा. बुलढाणा यांचे तक्रारीवरुन उपरोक्त आरोपी यांचे विरुध्द पो.स्टे. मलकापूर शहर येथे कलम 132, 121(2), 109(1), 318(4), 61(2), 189(2), 191(2), 191(3), 190 भा.न्या.सं. सहकलम 66 (ड) माहित तंत्रज्ञान कायदा, कलम 4,7,25 आर्म अॅक्ट, कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोनि. गणेश गिरी पो.स्टे. मलकापूर शहर करीत आहेत. सदर आरोपी हे मा. न्यायालय यांचे आदेशाने पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत.

ही कार्यवाही निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे आदेशान्वये तर  श्रेणिक लोडा अपर पोलीस अधीक्षक खामगांव,  अमोल गायकवाड-अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा,  आनंद महाजन उपविपोअ. मलकापूर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. सुनिल अंबुलकर स्था.गु.शा. बुलढाणा यांचे नेतृत्वात पोउपनि, अविनाश जायभाये, पोहेकॉ. दिपक लेकुरवाळे, शेख चाँद, गणेश पाटील, पोकॉ. गजानन गोरले स्थागुशा. बुलढाणा, पोहेकों. राजू आडवे तांत्रिक विष्लेषण विभाग बुलढाणा यांच्या पथकाने केली.

आरोपींनी पोलिसांवर केला हल्ला

कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपींनी हल्ला केला. यामध्ये काही अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले. गत काही दिवसांपासून मलकापूरमध्ये बनावट नोटांचे आमीष दाखवून फसवणुक करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे, पोलिसांनी नागरिकांची फसवणुक करणाऱ्यांकडे आपला मोर्चा वळविला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top