Mahabreaking

🔴 BREAKING
District Collector  :जिल्हाधिकारी उद्या बाळापुर दौर्‍यावर; जनसंवाद बैठकीत नागरिकांना समस्या मांडण्याचे आवाहन   Satypal Maharaj :महिलांच्या अंगातून अंधश्रद्धा निर्मुलन होत नाही तोपर्यंत समाज सुधारणा अशक्य : सत्यपाल महाराज Speeding Cargo Vehicle :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव मालवाहु उलटले; सुदैवाने जीवितहानी टळली District-Level Program :दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत उद्या गुढीपाडवा ,पट वाढवा जिल्हास्तरीय कार्यक्रम Prataprao Jadhav :सत्यशोधक चळवळ सुरू करुन सामाजिक क्रांती घडविण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले : प्रतापराव जाधव 1 quintal and 12 kg of ganja :एक क्विंटल १२ किलो गांजासह ५५ लाख ७८ हजारांचा एवज जप्त, दोन आरोपींना अटक District Collector  :जिल्हाधिकारी उद्या बाळापुर दौर्‍यावर; जनसंवाद बैठकीत नागरिकांना समस्या मांडण्याचे आवाहन   Satypal Maharaj :महिलांच्या अंगातून अंधश्रद्धा निर्मुलन होत नाही तोपर्यंत समाज सुधारणा अशक्य : सत्यपाल महाराज Speeding Cargo Vehicle :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव मालवाहु उलटले; सुदैवाने जीवितहानी टळली District-Level Program :दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत उद्या गुढीपाडवा ,पट वाढवा जिल्हास्तरीय कार्यक्रम Prataprao Jadhav :सत्यशोधक चळवळ सुरू करुन सामाजिक क्रांती घडविण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले : प्रतापराव जाधव 1 quintal and 12 kg of ganja :एक क्विंटल १२ किलो गांजासह ५५ लाख ७८ हजारांचा एवज जप्त, दोन आरोपींना अटक

Shri Shivaji Vidyalaya :श्री शिवाजी विद्यालय मासरूळ येथे वर्गमित्र स्नेहमिलन मेळावा उत्साहात 

Shri Shivaji Vidyalaya : श्री शिवाजी विद्यालय मासरूळ येथे वर्ग 10 वी बॅच 2002-03च्या माजी विद्यार्थ्यांनीं तब्ब्लल 23 वर्षाने अनोख्या स्वरूपाने वर्गमित्र स्नेहमीलन सोहळा साजरा केला.याकार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या रकमेतून शाळेला पुस्तके भेट दिली त्याचबरोबर प्रत्येक गुरुजनवर्ग तथा विदयार्थी मित्र-मैत्रिणींना आठवणींची साठवण म्हणून स्मृतिचिन्ह भेट दिले.

Shri Shivaji Vidyalaya

पंडित सावळे

मासरूळ : श्री शिवाजी विद्यालय मासरूळ येथे वर्ग 10 वी बॅच 2002-03च्या माजी विद्यार्थ्यांनीं तब्ब्लल 23 वर्षाने अनोख्या स्वरूपाने वर्गमित्र स्नेहमीलन सोहळा साजरा केला.याकार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या रकमेतून शाळेला पुस्तके भेट दिली त्याचबरोबर प्रत्येक गुरुजनवर्ग तथा विदयार्थी मित्र-मैत्रिणींना आठवणींची साठवण म्हणून स्मृतिचिन्ह भेट दिले.

शाळेचे माजी विदयार्थी श्री विनोद जाधव यांच्या लिखाणातून साकार झालेलं शालेय जीवनावर आधारित हे पुस्तक गुरुजनांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.माजी विद्यार्थ्यांनी तथा गुरुजनांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला.या जुन्या आठवणीने समस्त गुरुजन व वर्गमित्र भावुक झाले. या एकदिवशीय भरलेल्या शाळेत मित्र -मैत्रिणीनीं वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळून आनंद साजरा केला.हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतिक म्हणून भोजनाअंती सर्वांनी शीरखुर्माचा आस्वाद घेतला त्याचबरोबर या स्नेहमिलनाच्या पर्वावर भविष्यात सर्व मित्र-मैत्रिनींनीं एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणाचा संकल्प केला.
या कार्यक्रमप्रसंगी वर्ग 1 ते 10 पर्यंतचे माजी शिक्षक गोरे , सरोदे , पायघन ,  तायडे , जामनिक , म्हस्के,  आळेकर ,  सोनुने , तथा देविदास साळवे व सर्व माजी विद्यार्थी मित्र मैत्रिणी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top