Mahabreaking

🔴 BREAKING
District Collector  :जिल्हाधिकारी उद्या बाळापुर दौर्‍यावर; जनसंवाद बैठकीत नागरिकांना समस्या मांडण्याचे आवाहन   Satypal Maharaj :महिलांच्या अंगातून अंधश्रद्धा निर्मुलन होत नाही तोपर्यंत समाज सुधारणा अशक्य : सत्यपाल महाराज Speeding Cargo Vehicle :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव मालवाहु उलटले; सुदैवाने जीवितहानी टळली District-Level Program :दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत उद्या गुढीपाडवा ,पट वाढवा जिल्हास्तरीय कार्यक्रम Prataprao Jadhav :सत्यशोधक चळवळ सुरू करुन सामाजिक क्रांती घडविण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले : प्रतापराव जाधव 1 quintal and 12 kg of ganja :एक क्विंटल १२ किलो गांजासह ५५ लाख ७८ हजारांचा एवज जप्त, दोन आरोपींना अटक District Collector  :जिल्हाधिकारी उद्या बाळापुर दौर्‍यावर; जनसंवाद बैठकीत नागरिकांना समस्या मांडण्याचे आवाहन   Satypal Maharaj :महिलांच्या अंगातून अंधश्रद्धा निर्मुलन होत नाही तोपर्यंत समाज सुधारणा अशक्य : सत्यपाल महाराज Speeding Cargo Vehicle :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव मालवाहु उलटले; सुदैवाने जीवितहानी टळली District-Level Program :दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत उद्या गुढीपाडवा ,पट वाढवा जिल्हास्तरीय कार्यक्रम Prataprao Jadhav :सत्यशोधक चळवळ सुरू करुन सामाजिक क्रांती घडविण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले : प्रतापराव जाधव 1 quintal and 12 kg of ganja :एक क्विंटल १२ किलो गांजासह ५५ लाख ७८ हजारांचा एवज जप्त, दोन आरोपींना अटक

Vanchit Holds Protest :गॅस सिलेंडर साठी वंचितचे लोणार तहसील कार्यालयासमोर आंदोलन

Vanchit Holds Protest : राज्यभरात सुरू असलेल्या गॅस टंचाई, गॅस कमतरतेमुळे सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनावर अतिशय  विपरीत व आर्थिक झळ बसणारे परिणाम होत आहे.गॅस सिलिंडरसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात आले. लोणार येथेही वंचितच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनला देण्यात आले.

Vanchit Holds Protest

भागवत चव्हाण

लोणार : राज्यभरात सुरू असलेल्या गॅस टंचाई, गॅस कमतरतेमुळे सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनावर अतिशय  विपरीत व आर्थिक झळ बसणारे परिणाम होत आहे.गॅस सिलिंडरसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात आले. लोणार येथेही वंचितच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनला देण्यात आले.

सध्या राज्यभरात गॅस टंचाईमुळे  छोटे छोटे व्यावसायिक, हॉटेल्स, लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, हॉस्टेलमधील मेस आणि अनेक शहरांमध्ये शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मेस, जेवणाचे डबे बंद झाली आहेत. यामुळे सर्वसामान्य जनता हतबल झाली आहे. अनेक ठिकाणी एलपीजी गॅस कमी प्रमाणात मिळत असल्यामुळे रिक्षा भाडे वाढले आहे, त्याचा थेट परिणाम जनतेच्या खिशावर होत आहे. 11 मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी इशारा दिला होता की, मध्यमवर्गीय, गरीब कुटुंबे, हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या, फुल स्टॉल, विशेषत; रस्त्यावरील खाद्य विक्रेते, विवाह सोहळे व धार्मिक कार्यक्रमामधील केटरिंग व्यवसाय, एलपीजी वर चालणाऱ्या रिक्षा; तसेच एलपीजी आणि पेट्रोकेमिकल्स ची वाचणारे टंचाई या सर्वांमुळे एलपीजी वर अवलंबून असलेल्या अनेक उद्योगांवर प्रचंड परिणाम होतील. आज त्यांची ही चेतावणी खरी ठरली आहे. तरी वंचित बहुजन आघाडी ही सर्वसामान्यांसाठी  गॅस सिलेंडर साठी होणारी कृत्रिम टंचाई थांबवावी, गॅस सिलेंडरचा काळाबाजार थांबवावा,   वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून कम्युनिटी किचन सुरू करावेत, जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यामध्ये उज्वला गॅस योजनेअंतर्गत किती लोकांना गॅस सिलेंडर दिले आहे? याचे ऑडिट करावे आदींसह इतर मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष दिलीप राठोड, युवा तालुका अध्यक्ष गौतम गवई, युवा तालुका महासचिव पवन अवसरमोल, के. बी. इंगळे , शहराध्यक्ष महेंद्र मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तहसीलदार लोणार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रतन काशीराम मोरे, नितीन मोरे, रतन देविदास लहाने, राजेश लहाने, राहुल अंभोरे, सुरेश आश्रम मोरे, विनोद अंभोरे, रुपेश मोरे, राजू बाबुराव जाधव, नारायण जगदाळे, किसन गोपा चव्हाण, मंगेश मोरे, शामराव रामजी घुले, पुंजाराम आनंदा सोनुने, विलास लहाने,  प्रताप भालेराव, उद्धव साठे, दीपक अंभोरे यांच्यासह असंख्य वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top