Mahabreaking

[breaking_news]

Unfenced Well :संरक्षण कठडे नसलेली विहीर बनली धोकादायक, अपघाताची शक्यता

Unfenced Well :नाशिक जिल्ह्यात रस्त्याच्या बाजुला असलेल्या विहीरीत कार कोसळून एकाच कुटूंबातील नऊ जण ठार झाले होते. त्यामुळे, रस्त्याच्या बाजुला असलेल्या कठडे नसलेल्या विहीरी धोकादायक ठरत आहेत. अकोला शहरातील मोठी उमरी परिसरातील प्रभाग क्रमांक चारमध्ये सिद्धार्थ नगरात रस्त्यालगतच एक सार्वजनिक विहीर आहे.या विहीरीला कुठलेही संरक्षण नसल्याने अपघाताची शक्यता आहे. या परिसरातील नागरिकांनी विहीरीला कठडे लावण्याची मागणी केली आहे.

Unfenced Well

 मोठी उमरी परिसरातील प्रभाग क्रमांक चार मधील प्रकार ; विहीरीला संरक्षक कठडे बसविण्याची मागणी

अकोला : नाशिक जिल्ह्यात रस्त्याच्या बाजुला असलेल्या विहीरीत कार कोसळून एकाच कुटूंबातील नऊ जण ठार झाले होते. त्यामुळे, रस्त्याच्या बाजुला असलेल्या कठडे नसलेल्या विहीरी धोकादायक ठरत आहेत. अकोला शहरातील मोठी उमरी परिसरातील प्रभाग क्रमांक चारमध्ये सिद्धार्थ नगरात रस्त्यालगतच एक सार्वजनिक विहीर आहे.या विहीरीला कुठलेही संरक्षण नसल्याने अपघाताची शक्यता आहे. या परिसरातील नागरिकांनी विहीरीला कठडे लावण्याची मागणी केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे उघड्या विहीरीत कार कोसळल्याने नऊ जण ठार झाले. त्यामुळे, शासनाने रस्त्याच्या बाजुला असलेल्या खुल्या विहीरींचे ऑडीट करण्याचे आदेश दिले आहे. अकोला शहरातील मोठी उमरी परिसरात वॉर्ड क्रमांक चार मध्ये असलेली एक जुनी सार्वजनिक विहीर नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. या विहीरीला कुठलेही संरक्षण कठडे नाही.  विहीर थेट रस्त्यालगत असून कोणत्याही प्रकारचे मजबूत संरक्षण किंवा सुरक्षित कुंपण नसल्यामुळे येथे कधीही मोठी दुर्घटना घडू शकते.

परिसरात लहान मुले नेहमी खेळताना दिसतात, तसेच या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते. अशा परिस्थितीत एखाद्या मुलाचा किंवा वाहनाचा तोल जाऊन विहिरीत पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, याआधीही या विहिरीबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. सध्या काही नागरिकांनी स्वतःहून तात्पुरते कुंपण घालण्याचा प्रयत्न केला होता, पण तेही अपुरे ठरले आहे. विहिरीभोवती कचरा आणि अस्वच्छता देखील वाढत असून आरोग्याच्या दृष्टीनेही हा गंभीर मुद्दा बनला आहे.

त्यामुळे या विहिरीवर तात्काळ मजबूत झाकण बसवावे, सुरक्षित लोखंडी जाळी/compound करावे, परिसराची साफसफाई करून धोका टाळावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top