Water arrangements : सध्या तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे, मानवी देहासह पशुपक्षी , प्राण्यांवर या उष्णतेचा विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. उष्णतेमुळे तहान लागण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे तहान भागवण्यासाठी मानव जातीला पर्याय आहे. मात्र, पक्षी , प्राणी यांची देखील तहान भागविल्या गेली पाहिजे , या उदात्त हेतूने श्री शिवाजी व्यायाम शाळेच्या माध्यमातून गजानन इंगळे यांनी जय संताजी नगर व श्री शिवाजी व्यायाम शाळेच्या परिसरामध्ये ठीक ठिकाणी पानवठे लावून, पक्षांना पाणी पिण्याची व्यवस्था केली आहे .

साखरखेर्डा : सध्या तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे, मानवी देहासह पशुपक्षी , प्राण्यांवर या उष्णतेचा विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. उष्णतेमुळे तहान लागण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे तहान भागवण्यासाठी मानव जातीला पर्याय आहे. मात्र, पक्षी , प्राणी यांची देखील तहान भागविल्या गेली पाहिजे , या उदात्त हेतूने श्री शिवाजी व्यायाम शाळेच्या माध्यमातून गजानन इंगळे यांनी जय संताजी नगर व श्री शिवाजी व्यायाम शाळेच्या परिसरामध्ये ठीक ठिकाणी पानवठे लावून, पक्षांना पाणी पिण्याची व्यवस्था केली आहे .
सध्या उन्हाळा ऋतूला सुरुवात झाली आहे. दरम्यान उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. या उष्णतेमुळे तहान लागण्याचे प्रमाण अधिक झाल्याने कितीही पाणी पिल्यास मनुष्याचा घसा कोरडा पडत आहे. तहान भागवण्यासाठी मनुष्य पिण्याचे पाणी पर्यायी मार्गाने उपलब्ध करू शकतो . मात्र, पक्षी प्राणी यांचे पाण्याअभावी हाल होतात . परमेश्वराने केलेल्या निसर्ग रचनेनुसार , मानवासह पक्षी , प्राणी यांची नदी , तलाव व इतर पानवठे अशी व्यवस्था केलेली असते . परंतु, सद्यस्थितीमध्ये अनेक ठिकाणी नदी तलाव व इतर पानवठे आटले आहे . त्यामुळे पक्षी पाण्याच्या शोधात इतरत्र भटकंती करतात. मानवी कर्तव्य म्हणून आपल्याला जशी तहान भागवण्यासाठी पिण्याच्या पाण्याची गरज भासते असाच एका जीवाने दुसऱ्या जीवांसाठी प्रयत्न करणे अपेक्षित असते. याच उदात्त भावनेने श्री शिवाजी व्यायाम शाळेच्या माध्यमातून गजानन इंगळे यांनी साखरखेर्डा येथील जय संताजी नगर व श्री शिवाजी व्यायाम शाळा परिसरामध्ये पक्षांना तहान भागवण्यासाठी ठीक ठिकाणी जलपात्र लावले आहे . या छोट्याश्या उपक्रमातून आपल्याला आत्मिक समाधान लाभल्याची भावना त्यांनी यांनी व्यक्त केली

