Mahabreaking

[breaking_news]

Congress  :संघटन सृजन अभियानातून निवडणार काँग्रेसचा नविन जिल्हाध्यक्ष 

Congress  : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नविन जिल्हाध्यक्षांची निवड  “संघटन सृजन अभियानातून होणार आहे. संघटन सृजन अभियानाचा शनिवार ४ एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. एकूण आठ दिवसाच्या या अभियानाचा पहिला टप्पा हा चार दिवसांचा तर उर्वरित दुसरा टप्पा पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर पार पडणार आहे. या अभियानात काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून नवीन जिल्हाध्यक्ष निवडला जाणार असल्याची माहिती संघटन सृजन अभियानचे समन्वयक अब्दुलजी हनान यांनी दिली.
Congress
कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार; पत्रकार परिषदेत  पदाधिकाऱ्यांची माहिती
बुलढाणा :अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नविन जिल्हाध्यक्षांची निवड  “संघटन सृजन अभियानातून होणार आहे. संघटन सृजन अभियानाचा शनिवार ४ एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. एकूण आठ दिवसाच्या या अभियानाचा पहिला टप्पा हा चार दिवसांचा तर उर्वरित दुसरा टप्पा पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर पार पडणार आहे. या अभियानात काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून नवीन जिल्हाध्यक्ष निवडला जाणार असल्याची माहिती संघटन सृजन अभियानचे समन्वयक अब्दुलजी हनान यांनी दिली.
बुलढाणा येथील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात संघटन सृजन अभियानची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी अब्दुलजी हनान बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे, सह समन्वयक विरेंद्रजी जगताप, प्रशांतजी पचाडे, ऐश्वरी ताई राठोड यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना अब्दुलजी हनान म्हणाले की, संघटन सृजन अभियान आतापर्यंत २० राज्यांमध्ये राबविण्यात आले असून त्याठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुकत्या या अभियानाद्वारे करण्यात आल्या आहे. बुलढाणा जिल्ह्यातही स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संघटन सृजन अभियानाची समिती संवाद साधणार आहे. बूथ स्तर ते राज्य स्तरापर्यंत पक्षाला सशक्त करणे, समर्पित कार्यकर्त्यांना सक्षम करणे, जबाबदाऱ्यांचे पारदर्शकपणे वाटप करणे तसेच महिला व युवकांना पक्ष संघटनेत जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी करून घेणे ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत. या अभियानातूनच जिल्हाध्यक्षांसह विविध पदांच्या नियुक्त्या या पारदर्शक पद्धतीने केल्या जाणार आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तीला तीन पानांचा अर्ज भरावा लागणार आहे. त्यानंतर ६ नावांची शिफारस अभियान प्रदेश काँग्रेसकडे करणार असून त्यातूनच जिल्हाध्यक्ष निवडला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
असा आहे अभियानाचा जिल्ह्यातील पहिला टप्पा
अभियानाला शनिवारी जिल्ह्यात प्रारंभ झाला असून कृषी उत्पन्न बाजार समिती बुलढाणा य़ेथे जिल्हा विस्तारित कार्यकारणी सोबत अभियान समितीची चर्चा पार पडली. त्यानंतर बुलढाणा ब्लॉक काँग्रेस सोबत बैठक झाली.  रविवार ५ एप्रिल रोजी चिखली ,देऊळगावराजा, लोणार येथे अभियानाच्या बैठकी होणार आहे. सोमवार ६ एप्रिल रोजी मेहकर व खामगाव येथे ब्लॉक काँग्रेसच्या बैठकीला समन्वयक मार्गदर्शन करणार आहे. तर मंगळवार ७ एप्रिलला शेगाव, नांदुरा, मलकापूर येथे अभियानचे समन्वयक ब्लॉक काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
भरपूर काम करण्याची संधी मिळाली :   राहुलभाऊ बोंद्रे
गत १२ वर्षांपासून काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. या काळात भरपूर काम करण्याची संधी मिळाली. नवीन चेहऱ्याला संधी मिळावी, यासाठी मी जिल्हाध्यक्ष पदाचा अर्ज भरणार नसल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांनी जाहीर केले. आगामी काळातही काँग्रेस पक्षवाढीसाठीच अहोरात्र झटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top