Mahabreaking

🔴 BREAKING
Money Robbed :बँकेत पैसे जमा करायला निघालेल्या शेतकर्याचे २० हजार हिसकावले, दुचाकीची तोडफोड Argument over TV remote :टीव्हीच्या रिमोटवरून वाद; एकास लोखंडी रॉडने मारहाण, जिवे मारण्याची धमकी Medical Officers :साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला राज , दोन्ही वैष्णवी वैद्यकीय अधिकारी रुजू BJP Lodges Complaint :आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा; भाजपची साखरखेर्डा पोलिसांत तक्रार  Shailesh Savji: नामस्मरणाने  भक्तीभाव निर्माण होतो : शैलेश सावजी  Santosh Khade :महापुरुषांची जयंती साजरी करताना त्यांचे विचार आत्मसात करा :संतोष खाडे  Money Robbed :बँकेत पैसे जमा करायला निघालेल्या शेतकर्याचे २० हजार हिसकावले, दुचाकीची तोडफोड Argument over TV remote :टीव्हीच्या रिमोटवरून वाद; एकास लोखंडी रॉडने मारहाण, जिवे मारण्याची धमकी Medical Officers :साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला राज , दोन्ही वैष्णवी वैद्यकीय अधिकारी रुजू BJP Lodges Complaint :आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा; भाजपची साखरखेर्डा पोलिसांत तक्रार  Shailesh Savji: नामस्मरणाने  भक्तीभाव निर्माण होतो : शैलेश सावजी  Santosh Khade :महापुरुषांची जयंती साजरी करताना त्यांचे विचार आत्मसात करा :संतोष खाडे 

mata Jagdamba :जगदंबा मातेची वहन मिरवणूक , साखरखेर्डा वासियांनी जोपासली परंपरा

mata Jagdamba : येथील श्री शिवाजी व्यायाम शाळा स्थित असलेल्या श्री जगदंबा देवी मंदिरात चैत्र पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो . सकाळी श्री हनुमान जयंती साजरी करण्यात आली . त्यानंतर आपली परंपरा जोपासत वहन मिरवणूक काढण्यात आली .

mata Jagdamba

साखरखेर्डा : येथील श्री शिवाजी व्यायाम शाळा स्थित असलेल्या श्री जगदंबा देवी मंदिरात चैत्र पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो . सकाळी श्री हनुमान जयंती साजरी करण्यात आली . त्यानंतर आपली परंपरा जोपासत वहन मिरवणूक काढण्यात आली.

साखरखेर्डा-शेंदुर्जन मंडळात अवकाळी पावसासह गारपीट; ६० हेक्टरवरील पिके उध्वस्त

साखरखेर्डा येथील श्री शिवाजी व्यायाम शाळेत श्री जगदंबा देवीची स्थापना केलेली असून पुर्वीपासून चालत आलेल्या परंपरेनुसार २ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा निमित्त सायंकाळी ६ वाजता ढोल ताशांच्या निनादात गावामधून वहन मिरवणूक काढण्यात आली . प्रभात काळी श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी सजविलेल्या वाहनावर व्याघ्रारुढ श्री जगदंबा देवीची मूर्ती स्थानापन्न करण्यात आली . ढोल ताशांच्या निनादात गावामधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. श्री शिवाजी व्यायाम शाळा येथून वहन मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर जय संताजी नगर , श्री पलसिद्ध स्वामी मठ , तेथून परत येऊन , दगडी मस्जिद , गुजरी चौक , गणपती चौक , अहिल्याबाई होळकर नगर , म्हसोबा चौक या मार्गाने मिरवणूक काढण्यात आली . मार्गक्रमण करत असताना ठीक ठिकाणी आपापल्या घरासमोर भाविक महिलांनी सडामार्जन करून आकर्षक रांगोळी काढून श्री जगदंबा देवीची पुजा केली . व पंचाआरतीने आई जगदंबेला ओवाळून मनोभावे दर्शन घेतले . फटाक्यांची आतषबाजी व जगदंबा माता की जय , अशा गगनभेदी गर्जनेणे संपूर्ण गावामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते . रात्री ९ वाजता वहन मिरवणुकीचा श्री शिवाजी व्यायाम शाळा येथे समारोप करण्यात आला . श्री शिवाजी व्यायाम शाळेचे संस्थापक , अध्यक्ष स्व.भिमराव काका इंगळे आणि स्व . रामभाऊ जैन यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शन प्रेरणेने श्री शिवाजी व्यायाम शाळेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले . तर कायदा व सुव्यवस्था याला अनुसरून पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top