Mahabreaking

[breaking_news]

Vidarbha Patwari Association :विदर्भ पटवारी संघ मेहकर उपविभागाची वार्षिक आमसभा उत्साहात

Vidarbha Patwari Association :विदर्भ पटवारी संघ, नागपूर उपविभाग शाखा मेहकरची वार्षिक आमसभा ३१ मार्च २०२६ रोजी दत्त रेसिडेन्सी, मेहकर येथे उत्साहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे वरिष्ठ पदाधिकारी विजय गारोळे होते. यावेळी मेहकर उपविभाग व तालुकास्तरीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

Vidarbha Patwari Association

मेहकर उपविभागाच्या अध्यक्षपदी विजय गारोळे  यांची निवड

मेहकर : विदर्भ पटवारी संघ, नागपूर उपविभाग शाखा मेहकरची वार्षिक आमसभा ३१ मार्च २०२६ रोजी दत्त रेसिडेन्सी, मेहकर येथे उत्साहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे वरिष्ठ पदाधिकारी विजय गारोळे होते. यावेळी मेहकर उपविभाग व तालुकास्तरीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

रेती उत्खननासाठी चक्क बंधाऱ्यातून सोडले पाणी, ग्रामस्थांची पोलिसात धाव

मान्यवरांच्या स्वागतानंतर तलाठ्यांसमोरील विविध प्रशासकीय, सेवा व कामकाजातील अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी महसूल विभागातील बदलत्या कामकाज पद्धती, तांत्रिक अडचणी आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या यावर आपले मत व्यक्त केले. यानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन करत संघटनात्मक एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले. या वार्षिक आमसभेत सन २०२६-२७ या वर्षासाठी मेहकर उपविभाग व तालुकास्तरीय कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. मेहकर उपविभागाच्या अध्यक्षपदी विजय गारोळे, उपाध्यक्षपदी नितेश प्रल्हाद राणे, तर सचिवपदी शिवशंकर निकस यांची निवड झाली.

मेहकर तालुका कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून सविता जोशी, उपाध्यक्ष अमोल राठोड आणि सचिव संदीप पवार यांची निवड करण्यात आली. लोणार तालुका कार्यकारिणीत अध्यक्ष सचिन लक्ष्मण खिल्लारे, उपाध्यक्ष प्रफुल रघुनाथ अगळते आणि सचिव आशीष भगवान शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. सभेला विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा बुलढाणा शाखेचे जिल्हाध्यक्ष विजयेंद्र धोंडगे, जिल्हा सचिव शिवानंद वाकदकर, माजी जिल्हा सचिव रमाकांत माकोने यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकारी आणि मेहकर उपविभागातील सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष विजय गारोळे, जिल्हाध्यक्ष विजयेंद्र धोंडगे आणि जिल्हा सचिव शिवानंद वाकदकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभाग सचिव शिवशंकर निकस, मेहकर व लोणार तालुका पदाधिकारी तसेच कार्यकारिणी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.  संचालन मेहकर तालुका सचिव संदीप पवार यांनी केले, तर आभार  उपविभाग सचिव शिवशंकर निकस यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top