Mahabreaking

[breaking_news]

Opium Plants Cultivated :कांद्यांच्या शेतात लावली अफूची झाडे, धोत्रा नंदाई शिवारात १.११ क्विंटल अफु जप्त

Opium Plants Cultivated :कांदा बिजाच्या पिकात अफूची शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करीत १.११ क्विंटल अफु जप्त केला. धोत्रा नंदाई शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 44 लाख 53 हजार 200 रुपयांचा एवज जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपी शेतकऱ्यावर अंढेरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Opium Plants Cultivated

मिशन परिवर्तन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई

बुलढाणा : कांदा बिजाच्या पिकात अफूची शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करीत १.११ क्विंटल अफु जप्त केला. धोत्रा नंदाई शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 44 लाख 53 हजार 200 रुपयांचा एवज जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपी शेतकऱ्यावर अंढेरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाभिक समाजाची व्यथा आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधिमंडळात मांडली

पोलीस अधीक्षक  निलेश तांबे यांचे संकल्पनेतून जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी “मिशन परिवर्तन” राबविण्यात येत आहे.  त्या अनुषंगाने जिल्ह्यात अफू, गांजा व ईतर तत्सम अंमली पदार्थांची वाहतूक, साठवणूक, उत्पादन व विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करणे बाबत   पोलीस अधीक्षक   निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते. नमुद आदेशाप्रमाणे पोनि.   सुनिल अंबुलकर स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांची स्वतंत्र पथके तयार करुन, पथकांना वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे अंमली पदार्थ संबंधाने गोपनीय माहिती काढून कार्यवाही करणेबाबत सुचित केले होते. प्रकरणी, स्था.गु.शा.च्या पथकाने 30/03/2026 रोजी पो.स्टे. अंढेरा हद्दीत धाड टाकून कारवाई केली.

स्था.गु.शा. पथकाला 30 मार्च रोजी गोपनीय माहिती मिळाली की, पो.स्टे. अंढेरा हद्दीत ग्राम धोत्रा नंदई शिवारात संजय तुकाराम चेके रा. सरंबा या ईसमाने स्वतःचे शेतामध्ये अवैधरित्या व विनापरवाना अफूच्या झाडांची लागवड व संगोपन करुन, अफूची चोरटी विक्री करण्याच्या उद्ददेशाने ताब्यामध्ये बाळगून आहे. या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पो.स्टे. अंढेरा हद्दीत ग्राम धोत्रा नंदई शिवारातील गट नं. 368 मधील संजय तुकाराम चेके रा. सरंबा यांचे शेतामध्ये पंचा समक्ष धाड टाकली. यावेळी  सदर शेतामध्ये आरोपीने कांदा बियाण्यांच्या उभ्या असलेल्या पिकामध्ये अफूच्या झाडांची लागवड, संगोपण व साठवणूक केली असल्याचे दिसून आले.  आरोपी संजय तुकाराम चेके वय 50 वर्षे, रा. सरंबा ता. देऊळगांव राजा जि. बुलढाणा यांचे ताब्यातून (1) ओलसर अफूची बोंडे असलेली ओलसर झाडे वजन 111 किलो 33 ग्रॅम किं. 44,53,200/-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुध्द पो.स्टे. अंढेरा येथे अंमली औषधीद्रव्ये व मनः प्रभावी पदार्थ अधिनियम (N.D.P.S. Act.) कलम 8 (क), 18 (क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो.स्टे. अंढेरा करीत आहेत.

ही कारवाई  निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे आदेशान्वये तर   श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक खामगांव,   अमोल गायकवाड-अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा,   मनिषा कदम उपविपोअ. देऊळगांव राजा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. श्री. सुनिल अंबुलकर स्था.गु.शा. बुलढाणा डाणा यांचे नेतृत्वात पोउपनि. प्रताप बाजड, पोहेकॉ. दिगंबर कपाटे, पुरुषोत्तम आघाव, मपोहेकॉ. वनिता शिंगणे, पोकॉ. मंगेश सनगाळे, मनोज खरडे, सतीश नाटेकर, मपोकॉ. पूजा जाधव, चापोहेकॉ. समाधान टेकाळे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा, पोहेकॉ. राजू आडवे, पोकॉ. कैलाश ठोंबरे तांत्रिक विष्लेषण विभाग बुलढाणा, सपोनि. रुपेश शक्करगे प्रभारी अधिकारी व पो.स्टॉफ पो.स्टे. अंढेरा यांच्या पथकाने केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top