Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

Deepak Burkul: दे. राजा तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी दीपक बुरकुल यांची निवड

Deepak Burkul: सावंगी टेकाळे येथील भूमिपुत्र दीपक बुरकुल यांची महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेच्या देऊळगाव राजा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

Deepak Burkul

देऊळगाव राजा : सावंगी टेकाळे येथील भूमिपुत्र दीपक बुरकुल यांची महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेच्या देऊळगाव राजा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी देऊळगाव राजा येथील विश्रामगृहात महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेची तालुका बैठक पार पडली. या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष तुळशीराम दादा काळे तसेच जिल्हा उपाध्यक्ष दिनकरराव वाघ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बैठकीत तालुक्यातील विविध गावांमधील सरपंचांनी गावपातळीवरील प्रशासकीय अडचणी, कायदेशीर प्रश्न आणि संघटनात्मक कामकाजासंबंधी मुद्दे मांडले. या वेळी जिल्हाध्यक्ष तुळशीराम काळे यांनी, “गाव कारभारात उद्भवणाऱ्या प्रत्येक समस्येसाठी संघटना आपल्या पाठीशी ठामपणे उभी आहे. सरपंच व उपसरपंचांनी संघटनेच्या माध्यमातून एकजुटीने काम करावे,” असे आवाहन केले.
जिल्हा उपाध्यक्ष दिनकर वाघ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “सरपंच हा गावाचा केंद्रबिंदू असून तो गावातील सर्व समस्या सोडवतो; परंतु सरपंचांच्या समस्या सोडवण्यासाठी ही संघटना मजबूत व्यासपीठ ठरेल. महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना ही सर्वपक्षीय असून कोणतेही राजकारण यात येणार नाही.”या वेळी जिल्हाध्यक्ष तुळशीराम काळे यांनी संस्थापक अध्यक्ष गजानन दादा बोंडे, प्रदेशाध्यक्ष प्रा. राजेंद्र कराळे, तसेच विदर्भ अध्यक्ष अॅड. देवा पाचभाई यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्य अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले.
बैठकीदरम्यान सर्वानुमते नवीन पदाधिकारी निवड करण्यात आले : तालुका अध्यक्ष: दीपक बुरकुल (उपसरपंच, सावंगी टेकाळे),
कार्याध्यक्ष: चंद्रकला गजानन घुगे (सरपंच, दगडवाडी) , सचिव: लक्ष्मी व्यंकटराव कदम (उपसरपंच, गारखेड) यांची निवड करण्यात आली.
बैठकीला तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांमध्ये शिवाजी झोटे, संदीप म्हस्के, गणेश नागरे, वसुदेव शिंगणे, भिकाजी निलख, जनार्दन चित्तेकर, केशव बुरकुल, संजय मोरे, सुधीर खरात, विश्वासराव शिंगणे, संतोष ठेंग, अर्जुन आंधळे, रवींद्र भागिले, दत्ता कोल्हे, अनिल सोनपसारे, नितीन वायाळ, रामदास मुंडे, राजू निकाळजे, गजानन डोईफोडे, दशरथ चेके, विलास शेळके, सुनील झोटे आदी मान्यवरांचा समावेश होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top