Mahabreaking

[breaking_news]

Akola Superintendent of Police :ई-गव्हर्नन्समध्ये अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाची झेप; अर्चित चांडक यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

Akola Superintendent of Police :महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात तृतीय क्रमांक मिळविला आहे. या यशाबद्दल राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Akola Superintendent of Police

 राज्यात तृतीय क्रमांक; अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाचा डिजिटल क्षेत्रात लौकिक

 अकोला  : महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात तृतीय क्रमांक मिळविला आहे. या यशाबद्दल राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये डिजिटल सेवांचा वापर वाढविण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावरील विविध कार्यालयांचे सात निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये कार्यालयाचे संकेतस्थळ, ‘आपले सरकार’ प्रणालीची अंमलबजावणी, ई-ऑफिसचा वापर, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर तसेच भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) यांचा समावेश होता.

या मोहिमेत राज्यातील ३४ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांची दोन टप्प्यांत कसून तपासणी करण्यात आली. त्यामध्ये अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाने सर्व निकषांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला.

अकोला पोलिसांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत असून, या डिजिटल उपक्रमांमुळे पोलीस दलाची कार्यक्षमता वाढण्यास आणि नागरिकांना अधिक पारदर्शक व सुलभ सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

या यशात तांत्रिक सहकार्य करणारे किशन पनपालीया, पोउपनि पठाण, पोहवा गोपाल मुकंदे, आशिष आमले तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी हा पुरस्कार अकोला जिल्ह्यातील नागरिक, माध्यम प्रतिनिधी आणि अकोला पोलीस दलाला समर्पित केला आहे,असे शंकरराव शेळके  पोलीस निरीक्षक तथा जनसपंर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला  यांनी कळविले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top