Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

Mission Parivartan :“मिशन परिवर्तन”चा धडाका; अंढेरा हद्दीत अफू लागवडीवर छापा, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Mission Parivartan :जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात राबविण्यात येत असलेल्या “मिशन परिवर्तन” मोहिमेला यश मिळत असून, अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध अफू लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या धाडीत सुमारे ९ लाख १८ हजार रुपयांचा अफूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mission Parivartan

वांग्याच्या पिकात लपवलेली अफू शेती उघड; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

गजानन तिडके

देऊळगाव राजा : जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात राबविण्यात येत असलेल्या “मिशन परिवर्तन” मोहिमेला यश मिळत असून, अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध अफू लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या धाडीत सुमारे ९ लाख १८ हजार रुपयांचा अफूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेंतर्गत अफू, गांजा व इतर अंमली पदार्थांची लागवड, साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी विशेष पथके तयार करून गुप्त माहितीच्या आधारे कारवाईचे नियोजन केले.

२५ मार्च रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, अंढेरा हद्दीतील मेरा खुर्द शिवारात कृष्णा हरीराम वाघमारे (वय २६) याने स्वतःच्या शेतात अवैधरित्या अफूची लागवड केल्याची माहिती मिळाली. या आधारे पोलिसांनी गट क्रमांक २०३ मधील शेतात पंचांसमक्ष छापा टाकला.

छाप्यात आरोपीने वांग्याच्या उभ्या पिकामध्ये अफूची झाडे लपवून ठेवली असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ओलसर अफूची बोंडे, पाने व मुळांसह झाडे असा एकूण ११ किलो ४७९ ग्रॅम वजनाचा मुद्देमाल जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या अफूची किंमत अंदाजे ९,१८,३२० रुपये इतकी आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध अंमली औषधीद्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम अंतर्गत कलम ८(क) व १८(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंढेरा पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा व अमोल गायकवाड, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांच्या देखरेखीखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, एएसआय राजकुमार राजपूत यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी ही धडक कारवाई यशस्वी केली.या प्रकरणी आरोपीविरुध्द अंढेरा पोलिसांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश शंकर शक्करगे करीत आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थ माफियांमध्ये खळबळ उडाली असून “मिशन परिवर्तन” अंतर्गत पोलिसांचा धडाका कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top