Mahabreaking

🔴 BREAKING
Parents Meeting  :न.प. उर्दू प्राथमिक शाळा क्र. ६, फोर्ट येथे पालक सभेचे आयोजन! Encroachments :बाळापूर शहरातील सन २०११ पूर्वीची अतिक्रमणे होणार नियमाकुल Gas Cylinders :पातुरात गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांच्या रांगा, वाटपात अनियमिततेचा भाजपचा आरोप Speeding Cargo Vehicle :भरधाव मालवाहु वाहनाची दुचाकीस धडक, एक युवक जागीच ठार Rejects No-Confidence Motion :खैरव – बारलिंगा गट ग्रामपंचायतच्या सरपंचाविरुद्धचा अविश्वास ग्रामसभेने फेटाळला Sand Mafia  :खडकपूर्णा प्रकल्पात रेती माफियांचा हैदोस; अधिकारी कारवाईत, तर कनिष्ठ कर्मचारी मलाई खाण्यात दंग? Parents Meeting  :न.प. उर्दू प्राथमिक शाळा क्र. ६, फोर्ट येथे पालक सभेचे आयोजन! Encroachments :बाळापूर शहरातील सन २०११ पूर्वीची अतिक्रमणे होणार नियमाकुल Gas Cylinders :पातुरात गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांच्या रांगा, वाटपात अनियमिततेचा भाजपचा आरोप Speeding Cargo Vehicle :भरधाव मालवाहु वाहनाची दुचाकीस धडक, एक युवक जागीच ठार Rejects No-Confidence Motion :खैरव – बारलिंगा गट ग्रामपंचायतच्या सरपंचाविरुद्धचा अविश्वास ग्रामसभेने फेटाळला Sand Mafia  :खडकपूर्णा प्रकल्पात रेती माफियांचा हैदोस; अधिकारी कारवाईत, तर कनिष्ठ कर्मचारी मलाई खाण्यात दंग?

PSI and Constable arest : दोन हजाराची लाच घेतांना पीएसआयसह कॉस्टेबल गजाआड

PSI and Constable arest : दारू विक्रीच्या कारवाईची भीती दाखवत दर महिन्याला हप्त्याच्या स्वरूपात लाच मागणाऱ्या मुर्तीजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

PSI and Constable arest

“कारवाई टाळण्यासाठी महिन्याला मागितला हप्ता! ; मुर्तीजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यातील दोन पोलिस अडचणीत

 अकोला : दारू विक्रीच्या कारवाईची भीती दाखवत दर महिन्याला हप्त्याच्या स्वरूपात लाच मागणाऱ्या मुर्तीजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकोला घटकाकडे ११ फेब्रुवारी २०२६ रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, दीपक गणपतराव कानडे (वय ५६), सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि ज्ञानेश्वर विठ्ठलराव रडके (वय ३८), पोलीस हवालदार, दोघेही पोलीस ठाणे मुर्तीजापूर ग्रामीण येथे कार्यरत आहेत.

तक्रारदार शेतात दारूचा व्यवसाय करीत असल्याचा आरोप करत “तुझ्यावर कारवाई करू, केस दाखल करू” अशी धमकी देत आरोपींनी तक्रारदाराकडे दर महिन्याला ३ हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केली. अन्यथा दारू विक्रीचा गुन्हा दाखल करण्याची धमकीही देण्यात आली होती. नाईलाजाने तक्रारदाराने होकार दिला, मात्र नंतर थेट अँटी करप्शन ब्युरोकडे धाव घेत तक्रार नोंदवली.

तक्रारीनंतर कारंजा रोडवरील गणेश मेडिकलजवळील पुणेरी कॅन्टीन परिसरात तसेच मुर्तीजापूर पोलीस ठाण्यात लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान आरोपी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कानडे यांनी तडजोडीनंतर २ हजार रुपयांची मागणी केल्याचे पंचासमक्ष स्पष्ट झाले. त्याचप्रमाणे १४ फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यात हवालदार रडके यांनीही २ हजार रुपयांची मागणी केल्याचे समोर आले.यानंतर ११ मार्च २०२६ रोजी एसीबीने सापळा रचला, मात्र तक्रारदारावर संशय आल्याने दोन्ही आरोपींनी लाच स्वीकारण्यास नकार दिला. तरीही तपासादरम्यान लाच मागणी केल्याचे ठोस पुरावे समोर आल्याने दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन मुर्तीजापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे आणि पोलीस उपअधीक्षक मिलिंदकुमार बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक अतुल इंगोले, पोलीस निरीक्षक प्रविण वेरूळकर यांच्यासह एसीबीच्या पथकातील अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ अँटी करप्शन ब्युरोशी संपर्क साधावा. यासाठी टोल फ्री क्रमांक १०६४ तसेच अकोला कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top