Mahabreaking

[breaking_news]

Two speeding bikes :भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन जण ठार, एक गंभीर 

Two speeding bikes :खामगाव–लोखंडा शिवार परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी हिवरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Two speeding bikes

खामगाव–लोखंडा शिवारातील राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; हिवरखेड पोलिसांत गुन्हा

खामगाव : खामगाव–लोखंडा शिवार परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी हिवरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

“शेतमालाचा शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत केंद्रे सुरू ठेवा, अन्यथ आंदोलन;उद्धवसेनेचा इशारा

मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव येथील सतीफैल परिसरातील रहिवासी विनोद शामलाल सुसगोहर (वय ५५) व त्यांचे मित्र उमेश जगन पवार (वय ४५) हे ५ मार्च रोजी सकाळी सुमारे ९ वाजता दुचाकी क्रमांक एमएच २८ बीएच ६१९८ वरून खामगाव येथून लोखंडा शिवारातील लोखंडकार यांच्या ढाब्यावर साफसफाईच्या कामासाठी जात होते.

सकाळी सुमारे ९.३० वाजताच्या सुमारास लोखंडकार ढाब्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर समोरून येणाऱ्या एमएच २८ बीझेड ३२९९ क्रमांकाच्या दुचाकीने भरधाव व निष्काळजीपणे येत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात विनोद सुसगोहर आणि पाठीमागे बसलेले उमेश पवार हे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी दोघांनाही तातडीने खामगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) हलविले. उपचारादरम्यान विनोद सुसगोहर यांचा रात्री सुमारे ९.३० वाजता मृत्यू झाला. तर गंभीर जखमी असलेल्या उमेश पवार यांना पुढील उपचारासाठी शिर्डी येथे हलविण्यात आले असता ६ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता त्यांचाही मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातात दुसऱ्या दुचाकीचा चालक रतन भानू कोळपे हा देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातामुळे दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेबाबत हिवरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top