Mahabreaking

🔴 BREAKING
Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction : बाळापूर येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction : बाळापूर येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद

sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त

sand smugglers :तालुक्यात अवैध रेती उपसा व वाहतुकीविरोधात महसूल विभागाकडून कारवाया सुरू असतानाही रेती तस्करांचा मुजोरपणा कमी होत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. महसूल पथकाने पाठलाग करून अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडत जप्त केल्याची कारवाई दोन मार्चच्या रात्री करण्यात आली.

sand smugglers

गजानन तिडके

देऊळगाव राजा : तालुक्यात अवैध रेती उपसा व वाहतुकीविरोधात महसूल विभागाकडून कारवाया सुरू असतानाही रेती तस्करांचा मुजोरपणा कमी होत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. महसूल पथकाने पाठलाग करून अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडत जप्त केल्याची कारवाई दोन मार्चच्या रात्री करण्यात आली.

दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले

मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा तहसील कार्यालयाच्या पथकाला अवैध रेती वाहतुकीची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. यावेळी एमएच–जे–१६१६ क्रमांकाचा टिप्पर अवैधरित्या रेती वाहतूक करत असल्याचे आढळून आले. महसूल पथकाने तत्काळ पाठलाग करून देऊळगाव महीजवळील रस्त्यावर टिप्पर पकडत जप्त केला.
जप्त केलेले वाहन पुढील कारवाईसाठी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात लावण्यात आले आहे. या कारवाईत सहायक महसूल अधिकारी यू. व्ही. गरकळ, ग्राम महसूल अधिकारी डी. व्ही. तांबे, महसूल सेवक शरद काकडे यांनी सहभाग घेतला.दरम्यान, अवैध रेती तस्करांविरोधातील कारवायांमध्ये सातत्य असले तरी काही वेळा ग्रामपातळीवरील कर्मचाऱ्यांकडूनच तस्करांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हालचालींची माहिती मिळत असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. त्यामुळे अनेकदा कारवाईसाठी गेलेल्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याचेही बोलले जात आहे.अवैध रेती उपसा व वाहतुकीविरोधातील कारवाई पुढेही कठोरपणे सुरू ठेवणार असल्याचे तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top