Mahabreaking

🔴 BREAKING
Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Cold water :बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात मिळणार थंड पाणी Shyam Manav :जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवा: श्याम मानव Minor Girl Sentenced :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिने कारावास Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Cold water :बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात मिळणार थंड पाणी Shyam Manav :जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवा: श्याम मानव Minor Girl Sentenced :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिने कारावास Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद

Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले

Shocking incident :चिखली–जालना मार्गावरील दगडवाडी फाट्यावर एका इसमाला जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवून रोख रक्कम, मोबाईल आणि खात्यातील पैसे काढून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चार अज्ञात इसमांविरुद्ध देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shocking incident
हातपाय तोडण्याची धमकी देत रोख रक्कमेसह मोबाईल लंपास; कारमधून नेऊन खात्यातूनही काढले पैसे

गजानन तिडके 
देऊळगाव राजा : चिखली–जालना मार्गावरील दगडवाडी फाट्यावर एका इसमाला जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवून रोख रक्कम, मोबाईल आणि खात्यातील पैसे काढून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चार अज्ञात इसमांविरुद्ध देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय जयवंतराव उगले (वय ५६, व्यवसाय – शेती, रा. उगला, ह.मु. नगरपरिषद सिंदखेड राजा) हे ४ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी जात होते. दरम्यान, त्यांच्या लहान मुलाचा फोन आल्याने ते परत आपल्या हॉटेलकडे येत होते.
चिखली–जालना रोडवरील दगडवाडी फाटा येथे लघुशंकेसाठी ते रस्त्याकडेला थांबले असताना मागून एक चारचाकी वाहन आले. या वाहनातून उतरलेल्या एका इसमाने त्यांच्याशी बोलत अचानक त्यांना जबरदस्तीने वाहनात बसवले. वाहनात आधीच असलेल्या इतर तिघांनी त्यांना धमकावत मारहाणीची भीती दाखवली. तक्रारीनुसार, आरोपींनी त्यांच्या खिशातील ७०० रुपये रोख रक्कम व रेडमी कंपनीचा जुना मोबाईल फोन काढून घेतला. तसेच वाहनातील आरोपींनी हिंदी भाषेत धमकावत “तेरे हाथ-पैर तोड़ देंगे और जान से मार देंगे” अशी धमकी दिली. याचदरम्यान त्यांच्या स्टेट बँक शाखा सिंदखेड राजा येथील खात्यातून ५ हजार रुपये मोबाईल क्रमांक ९३७३३१३२४० वर फोन-पे द्वारे ट्रान्सफर केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. काही अंतरावर जालना रोडवर नेल्यानंतर आरोपींनी संजय उगले यांना वाहनातून खाली उतरवून तेथून पसार झाल्याचे सांगितले जाते.
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०९(६), ३५१(२), ३५१(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस  करीत आहेत. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top