Mahabreaking

🔴 BREAKING
Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Cold water :बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात मिळणार थंड पाणी Shyam Manav :जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवा: श्याम मानव Minor Girl Sentenced :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिने कारावास Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Cold water :बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात मिळणार थंड पाणी Shyam Manav :जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवा: श्याम मानव Minor Girl Sentenced :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिने कारावास Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद

Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Clashes over solar pump dispute :तालुक्यातील रोहना येथे शेती व विहिरीवरील सोलार पंपाच्या हिस्स्यावरून झालेल्या वादातून एका कुटुंबातील सदस्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Clashes over solar pump dispute

देऊळगाव राजा : तालुक्यातील रोहना येथे शेती व विहिरीवरील सोलार पंपाच्या हिस्स्यावरून झालेल्या वादातून एका कुटुंबातील सदस्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल दत्तू खरात (वय २९, व्यवसाय – शेती, रा. रोहना, ता. देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे १० ते १०.३० वाजताच्या दरम्यान रोहना गावात ही घटना घडली. फिर्यादी व आरोपी हे परस्पर भाऊकीचे असून त्यांच्यात पूर्वीपासून शेतीसंबंधी वाद सुरू आहे. विहिरीवरील सोलार पंपातील हिस्स्यावरून वाद वाढल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.
तक्रारीनुसार, आरोपी विलास उत्तम खरात यांनी फिर्यादी अमोल खरात यांच्यावर लोखंडी गजाने मारहाण केली. तसेच हर्षद विलास खरात, विशाल विलास खरात आणि आकाश अशोक खरात यांनी फिर्यादीचे वडील, आई व पत्नी यांना लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले. दरम्यान, संगीता विलास खरात, प्रिती विलास खरात व वच्छला अशोक खरात यांनी शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसात सात जणांविरुध्द भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८९(२), १९०(२), १९१(२), ११८(१), ११५(२), ३२४(४), ३५१(२), ३५१(३) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फिर्याद पोलीस हेडकॉन्स्टेबल नायाबराव मोगल यांनी नोंदवली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे रोहना परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top