Mahabreaking

🔴 BREAKING
Firefight in Anvi Mirzapur: अन्वी मिर्झापूर येथे अग्नी तांडव ; घराला लागलेल्या आगीत 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू Speeding car: भरधाव कार रस्त्याच्या बाजुला असलेल्या विहिरीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू Malkapur depot driver’s : मलकापूर आगार बस चालकाचे जेष्ठ नागरिकांसोबत उद्धट वर्तन; कारवाईची मागणी substation in Sakharkherda: साखरखेर्डा येथील वीज वितरण उपकेंद्रातील कार्यालय, निवासस्थानांची दयनीय अवस्था contesting the election: निवडणूक लढवत आहात, तर व्हिजन काय?  ‘Farmer Cup : अकोला तालुका ‘फार्मर कप एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण’ Firefight in Anvi Mirzapur: अन्वी मिर्झापूर येथे अग्नी तांडव ; घराला लागलेल्या आगीत 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू Speeding car: भरधाव कार रस्त्याच्या बाजुला असलेल्या विहिरीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू Malkapur depot driver’s : मलकापूर आगार बस चालकाचे जेष्ठ नागरिकांसोबत उद्धट वर्तन; कारवाईची मागणी substation in Sakharkherda: साखरखेर्डा येथील वीज वितरण उपकेंद्रातील कार्यालय, निवासस्थानांची दयनीय अवस्था contesting the election: निवडणूक लढवत आहात, तर व्हिजन काय?  ‘Farmer Cup : अकोला तालुका ‘फार्मर कप एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण’

Gram Sabha at Anjani Bu: दारूबंदीसह विविध विषयावर गाजली अंजनी बु येथील ग्रामसभा

Gram Sabha at Anjani Bu: अंजनी बु ग्रामपंचायतीत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी २९ सप्टेंबर रोजी आयोजित ग्रामसभेत अनेक ज्वलंत प्रश्नांवरून मोठा गदारोळ झाला. सभेच्या अध्यक्षपदी अशोक दत्तात्रय नागोलकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली होती. महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या या सभेत प्रथम दारूबंदीचा ठराव घेण्यात आला.

Anjani Bu discussed various issues

 ग्रामपंचायतच्या कामकाजावर झाली वादळी चर्चा
डोणगाव :  अंजनी बु ग्रामपंचायतीत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी २९ सप्टेंबर रोजी आयोजित ग्रामसभेत अनेक ज्वलंत प्रश्नांवरून मोठा गदारोळ झाला. सभेच्या अध्यक्षपदी अशोक दत्तात्रय नागोलकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली होती. महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या या सभेत प्रथम दारूबंदीचा ठराव घेण्यात आला.
मारोती पायघन आणि इतर ग्रामस्थांनी गावातील देशी-विदेशी दारू दुकाने, वरली मटका व इतर अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी लेखी अर्ज दिला होता. महिलांचे होणारे हाल, तरुणांचे उध्वस्त संसार आणि अपघाती मृत्यू या गंभीर समस्यांचा विचार करून ग्रामस्थांनी दारूबंदीचा ठराव एकमताने मंजूर केला.
त्यानंतर ग्रामसभेचे वातावरण तापले. ग्रामपंचायत कारभारावर गंभीर प्रश्नांची सरबत्ती झाली. भागवत पुंड आणि इतर ग्रामस्थांनी आरोप केला की ग्रामपंचायत आवारात आणलेली नवीन घंटागाडी भंगार अवस्थेत पडली असून तिचा एकदाही वापर झालेला नाही. यावर ग्रामपंचायत प्रशासनाने “जिल्हा परिषदेने दिली असल्याने आम्ही काही करू शकत नाही” असे उत्तर दिले.
ग्रामस्थांनी सरकारी नोंदी असताना ग्रामपंचायतने स्वतंत्र “रफ रेकॉर्ड” तयार केल्याचा आरोप केला. “सरकारी रेकॉर्ड असताना रफ रेकॉर्डची गरज काय?” असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थ आक्रमक झाले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्यांची दुरवस्था, घरकुलातील अनियमितता, भ्रष्टाचार आणि विविध योजनांत खोट्या नोंदी केल्याबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
सरपंच व सचिव गप्प राहिल्याने संतप्त जमावाने ग्रामपंचायतीचे रजिस्टर फाडण्यास भाग पाडले. “प्रशासनाला रफ रजिस्टर ठेवण्याचा अधिकार आहे का?” असा थेट सवाल ग्रामस्थांनी केला. अनेक वर्षांपासून समस्या प्रलंबित राहिल्याने आणि बोगस कारभार उघड झाल्याने ग्रामपंचायत अखेर ग्रामस्थांसमोर नमली.
या ग्रामसभेत युवावर्गाने प्रशासनाला जाब विचारण्यात पुढाकार घेतला. दरम्यान, गावातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडेही करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top