Biker killed : मेहकर-डोणगाव रोडवर हॉटेल शेरे पंजाब आणि शिंदे कॉलेजच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात हिवरा साबळे येथील एका ३८ वर्षीय मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला.गजानन अंबादास धांडे (वय ३८, रा. हिवरा साबळे, ता. मेहकर) असे मृतक युवकाचे नाव आहे.

मेहकर ते डोणगाव रस्त्यावरील घटना
डोणगाव : मेहकर-डोणगाव रोडवर हॉटेल शेरे पंजाब आणि शिंदे कॉलेजच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात हिवरा साबळे येथील एका ३८ वर्षीय मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला.गजानन अंबादास धांडे (वय ३८, रा. हिवरा साबळे, ता. मेहकर) असे मृतक युवकाचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ३० सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास गजानन अंबादास धांडे (वय ३८, रा. हिवरा साबळे, ता. मेहकर) हे त्यांची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल (क्र. MH-28-BE-9066) घेऊन मेहकरहून घरी परतत होते. दरम्यान, शेरे पंजाब हॉटेल आणि शिंदे कॉलेजच्या मधोमध रस्त्यावर अचानक जंगली जनावर समोर आल्याने त्यांनी मोटरसायकलवरील ताबा गमावला. भरधाव वेगामुळे झालेल्या या अपघातात ते गंभीर जखमी झाले.
डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी विशाल दामोदर झनक (रा. मेहकर) यांनी डोणगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तक्रारीवरून डोणगाव पोलीसांनी कलम 106(1) BNS अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

