Mahabreaking

[breaking_news]

Dr. Shatrughan Jadhav :बी. एस. पटेल महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. शत्रुघ्न जाधव रुजू

Dr. Shatrughan Jadhav : तालुक्यातील पळशी वैद्य येथील सातपुडा शिक्षण व ग्रामविकास संस्था संचालित पिंपळगाव (काळे) येथील बापूमिया शिरादुद्दीन पटेल महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. शत्रुघ्न जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी दि. ३० जानेवारी रोजी पदभार स्वीकारला आहे.

Dr. Shatrughan Jadhav

जळगाव जामोद : तालुक्यातील पळशी वैद्य येथील सातपुडा शिक्षण व ग्रामविकास संस्था संचालित पिंपळगाव (काळे) येथील बापूमिया शिरादुद्दीन पटेल महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. शत्रुघ्न जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी दि. ३० जानेवारी रोजी पदभार स्वीकारला आहे.

डॉ. जाधव यांना उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव लाभला आहे. यापूर्वी ते आदर्श महाविद्यालय, हिंगोली येथे मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांनी देवगिरी महाविद्यालय, परभणी येथेही अध्यापन सेवा बजावली आहे.

जळगाव (जामोद) तालुक्यातील भेंडवळ येथील मूळ रहिवासी असलेले डॉ. जाधव यांनी १९९२ साली मराठी विषयात एम.ए. पदवी प्राप्त केली. त्यानंतर १९९८ मध्ये मराठी विषयात पीएच.डी. (आचार्य) पदवी संपादन केली. त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाची नेट (NET) परीक्षा देखील यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे.

त्यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय अनुभवाचा लाभ महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी होईल, अशी अपेक्षा संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top