Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले

Tehran shaken! :मध्यपूर्वेत तणावाने भीषण रूप धारण केले असून इस्त्रायलने शनिवारी पहाटे इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर जोरदार हवाई हल्ले चढवले. इराणी वृत्तसंस्था इरना यांच्या माहितीनुसार, दक्षिण इराणमध्ये झालेल्या बॉम्बहल्ल्यांत तब्बल ४० विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून ४५ जणी जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.

Tehran shaken!
अमेरिका-इस्त्रायलचा इराणवर संयुक्त हल्ला; ४० विद्यार्थिनींचा मृत्यू, इराणकडून ४०० क्षेपणास्त्रांनी प्रत्युत्तर

तेल अवीव/तेहरान : मध्यपूर्वेत तणावाने भीषण रूप धारण केले असून इस्त्रायलने शनिवारी पहाटे इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर जोरदार हवाई हल्ले चढवले. इराणी वृत्तसंस्था इरना यांच्या माहितीनुसार, दक्षिण इराणमध्ये झालेल्या बॉम्बहल्ल्यांत तब्बल ४० विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून ४५ जणी जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी विश्व या पेजला भेट द्या 

इस्त्रायलच्या कारवाईला प्रत्युत्तर देताना इराणनेही तात्काळ पलटवार केला. विविध आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या अहवालांनुसार, इराणने सुमारे ४०० क्षेपणास्त्रे डागून इस्त्रायलवर हल्ला चढवला. त्यामुळे दोन्ही देशांतील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.
इराणने केवळ इस्त्रायललाच लक्ष्य केले नाही, तर कुवैत, कतार, बहरीन आणि सौदी अरेबियातील अमेरिकन लष्करी तळांवरही हल्ले केल्याची माहिती आहे. तसेच संयुक्त अरब अमिरातीतील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या दुबई शहरालाही लक्ष्य करण्यात आले.
दरम्यान, इस्त्रायलने इराणच्या गुप्तचर मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे कार्यालय आणि इराणच्या अणुऊर्जा संस्थेवर हल्ला केल्याचे समोर आले आहे. हल्ल्यानंतर खामेनेई यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती आहे.
इस्त्रायलने या नव्या लष्करी कारवाईला ‘लायन्स रोर’ (सिंहाची गर्जना) असे नाव दिले आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी अल जझीराने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, ही अमेरिका आणि इस्त्रायल यांची संयुक्त लष्करी मोहीम आहे.
ही कारवाई इराण आणि अमेरिका यांच्यात अण्वस्त्र करारासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी यापूर्वीच इराणला कठोर इशारा दिला होता. अमेरिकेच्या आणि तिच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
ट्रम्प यांच्या मते, अमेरिकन सैन्य इराणच्या क्षेपणास्त्र साठ्याचा नाश करून त्यांचा मिसाईल कार्यक्रम पूर्णतः निष्प्रभ करण्याच्या प्रयत्नात आहे. दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रकल्प हा सर्वात मोठा वादाचा मुद्दा ठरला आहे.
इराणने या मुद्द्यावर कोणतीही तडजोड मान्य नसल्याचे ठामपणे सांगितले आहे. हा कार्यक्रम त्यांच्या संरक्षणासाठी अत्यावश्यक असल्याचा त्यांचा दावा आहे. जून २०२५ मध्ये इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांवर केलेल्या हल्ल्यावेळी स्वतःच्या क्षेपणास्त्रांमुळेच देशाचे संरक्षण झाले, असेही इराणी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
इराणने स्पष्ट केले आहे की, चर्चा केवळ अणुकार्यक्रमापुरती मर्यादित राहील; क्षेपणास्त्र कार्यक्रम किंवा प्रादेशिक संघटनांबाबत कोणतीही चर्चा होणार नाही. या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेतील संघर्ष आणखी चिघळण्याची भीती व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top