Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड

Janavi Ulemale : स्थानिक श्री तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालयातील बी.एस्सी. भाग–२ ची विद्यार्थिनी कु. जानवी विजय उलेमाले हिची ‘प्रेरणा’ या राज्यस्तरीय नेतृत्वगुण विकास शिबिरासाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. २४ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ती या शिबिरात सहभागी झाली आहे.

Janavi Ulemale

 वाशीम : स्थानिक श्री तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालयातील बी.एस्सी. भाग–२ ची विद्यार्थिनी कु. जानवी विजय उलेमाले हिची ‘प्रेरणा’ या राज्यस्तरीय नेतृत्वगुण विकास शिबिरासाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. २४ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ती या शिबिरात सहभागी झाली आहे.

जिल्ह्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी वाशिम पेजला भेट द्या 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित श्री व्यंकटेश सेवा समिती, वाशीम संचालित श्री तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाची स्वयंसेविका असलेल्या जानवी उलेमाले हिने कला व नृत्य क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविले आहे. यापूर्वीही तिने विद्यापीठ स्तरावर महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले असून विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांत तिचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

‘प्रेरणा’ हे राज्यस्तरीय शिबिर युवकांमधील नेतृत्वगुण, व्यक्तिमत्त्व विकास आणि विविध कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी आयोजित केले जाते. यावर्षी या शिबिराचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे करण्यात आले आहे. या शिबिरात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत चमू सहभागी होत असून वाशीम जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी श्री तुळशीरामजी जाधव महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची निवड ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

या यशाबद्दल श्री व्यंकटेश सेवा समितीचे अध्यक्ष ॲड. विजयरावजी जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष जाधव, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पदमानंद तायडे, महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. रिंकू रुक्के तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जानवीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top